विशाल देवकर, प्रतिनिधी नागपूर, 12 मे: बासरी वादनाला भारतात एक कला म्हणूनच नाहीतर अध्यात्मिक महत्त्व देखील आहे. श्रीकृष्णाला मुरलीधर म्हणून त्यासाठीच ओळखलं जातं. बासरीच्या मधुर स्वरांनी कुणीही मंत्रमुग्ध होतं. असंच अनेकांना मंत्रमुग्ध करण्याचं काम नागपूरमधील युवा ‘बांसुरीवाला’ करतोय. शुभम चोपकर असं या बासरी वादकाचं नाव असून तो सोशल मीडियावरही खूप लोकप्रिय आहे. लहानपणापासूनच बासरी वादनाची आवड शुभमला लहानपणापासूनच बासरी वादनाची आवड होती. वयाच्या 6 वर्षांपासूनच त्यानं बासरी वादनात स्वत:ला झोकून दिलं आणि कलेच्या या क्षेत्रातच भविष्य शोधण्याचा निर्णय घेतला. शिक्षण पूर्ण करून छोटासा व्यवसाय सुरू केला तरीही बासरी वादनासाठी वेळ काढला. सोशल मीडियाच्या माध्यमातून बासरी वादनाला प्रोत्साहन मिळू लागले. नागपूर सोबतच संपूर्ण महाराष्ट्रातील चाहत्यांनी कौतुक केलं, असं शुभम सांगतो.
शास्त्रीय संगिताचे घेतले धडे शुभम सुरुवातील स्वत:ची आवड म्हणूनच बासरी वादन करत होता. पण पुढे शास्त्रीय संगिताची ओळख झाली आणि नागपुरातील अरविंद उपाध्ये यांच्याकडून प्राथमिक धडे गिरवायला सुरुवात केली. पंडित प्रमोद देशमुख यांनी शास्त्रीय संगितातले बारकावे शिवकले. तर प्रख्यात बासरी वादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्याकडे मुंबईला जावून ज्ञान साधना सुरू आहे, असेही शुभम सांगतो. शुभमकडे 24 क्लासिकल म्युझिकच्या बासरी सध्या शुभमकडे 24 हिंदुस्तानी क्लासिकल म्युझिकच्या बासरी आहेत. या बासरीचे वैशिष्ट्य असं की स्केलनुसार दोन ते तीन बासरी असतात. प्रत्येक बासरीचे स्वतःचे असे वैशिष्ट्य आहे. गाण्याच्या उपयुक्ततेनुसार ती बासुरी वाजवली जाते. क्लासिकल आणि वेस्टर्न या दोन्ही प्रकारच्या बासुरी त्याच्याकडे आहेत. बासरी वादनाला पारंपरिक संगिता सोबतच नव्याची जोड देत हा वसा जपण्याचा संकल्प आहे. नाविण्यपूर्ण कलाकृती लोकांपुढे सादर करण्याचा प्रयत्न असेल, असंही शुभम म्हणतो. वडिलांनी लॉकडाऊनमध्ये मास्क वाटले, लेकीने आपल्या आवाजाने संभाजीनगर जिंकलं, VIDEO लवकरच फ्यूजन सूत्र बँड आगामी काळात प्रोडक्शन बेस फ्युजन सूत्र नावाने बँड काढतो आहे. यामध्ये पाच सदस्यांचा समावेश आहे. हा बँड नक्कीच लोकांच्या पसंतीत पात्र ठरेल अशी आमची आशा आहे, असं शुभमनं सांगितलं. शास्त्रीय शिक्षण घेतल्यापासून शुभम शास्त्रीय संगिताचे विविध कार्यक्रम करत आहे. आजवर त्याने अनेक कार्यक्रम, स्टेज शो, प्रख्यात म्युझिक कंपनीसाठी अल्बम तयार केले आहेत. नवशिक्यांना शुभमचा सल्ला बासरी वरकरणी बघितलं तर कठीण वाद्य वाटतं. मात्र बासरीचा नियमित सराव आणि शिकण्याची इच्छा असली तर प्रत्येक जण बासरी वादन करू शकतो. नियमित सराव आणि शिकण्याची इच्छा असेल तर बासरी शिकता येते आणि बासरी वाजवणारे जितके जास्त लोक या क्षेत्रात येतील तितकी वेगवेगळ्या रूपात बासरीचे सूर अनुभवता येतील. त्यामुळे बासरी या वाद्यामध्ये आणि पर्यायाने शास्त्रीय संगीतात लोकांना नाविण्यपूर्ण सूर अनुभवता येतील. त्यामुळे बासरी वादनाकडे इच्छुकांनी जास्तीत जास्त संख्येने यावे, असं आवाहन शुभम चोपकर करतो.