Home /News /maharashtra /

Nagpur Crime: आंबा आणि चिंचा देण्याचे आमिष दाखवत 7 मुलांवर अनैसर्गिक अत्याचार, नागपुरातील खळबळजनक घटना

Nagpur Crime: आंबा आणि चिंचा देण्याचे आमिष दाखवत 7 मुलांवर अनैसर्गिक अत्याचार, नागपुरातील खळबळजनक घटना

Representative Image

Representative Image

Nagpur Crime News: नागपुरात सात अल्पवयीन मुलांसोबत एका तरुणाने अनैसर्गिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

नागपूर, 1 जून : नागपुरातून (Nagpur) एक खळबळजनक आणि धक्कादायक अशी घटना समोर आली आहे. एका विकृत मानसिकतेच्या आरोपीने सात लहान मुलांसोबत अनैसर्गिक अत्याचार (sexual assault)  केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूरच्या सीताबर्डी पोलीस (Sitabardi Police Nagpur) ठाण्याच्या हद्दीतील महाराजबाग परिसराला लागून असलेल्या एका पडक्या घरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पॉस्को अंतर्गत आरोपीला अटक केली असून या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपीचं नाव मयुर मोडक आहे. सध्या तो सीताबर्डी पोलिसांच्या ताब्यात असून अत्यंत धक्कादायक कृत्याबद्दल पोलीस त्याचा तपास करत आहे. आरोपीने सीताबर्डी भागातील वसंतराव नाईक झोपडपट्टीतील सात अल्पवयीन मुलांवर नैसर्गिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. आंबा आणि चिंचा देण्याचं आमिष एप्रिल ते 27 मे या कालावधीत या सर्व घटना घडल्या आहेत. आंबा आणि चिंचा देण्याचे आमिष दाखवून आरोपी लहान मुलांना महाराज बाग परिसरातील एका पडक्या घरात घेऊन जात होता. त्यानंतर त्यांच्यावर आरोपी अत्याचार करत होता. वाचा : बाहुलीला फासावर चढवत 8 वर्षीय चिमुकल्याने घेतला गळफास, पुण्यातील धक्कादायक घटना असा उघडकीस आला प्रकार आरोपीचं एप्रिलपासून हे घृणास्पद कृत्य सुरू होतं. शुक्रवार 27 मे रोजीही मयूरने नऊ वर्षांच्या मुलासोबत अनैसर्गिक कृत्य केले. पीडित घरी परतल्यावर मुलाला वेदनांनी त्रासलेले पाहून वडिलांनी विचारपूस सुरू केली. यावर मुलाने वस्तुस्थिती सांगितली. वाचा : बिल्डर संजय बियाणी यांच्या हत्येचा उलगडा, हत्येच्या षडयंत्राबाबत धक्कादायक माहिती उघड गुन्हा दाखल, पोलीस तपास सुरू आरोपी इतर मुलांसोबतही अनैसर्गिक कृत्य करीत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पीडित मुलाच्या वडिलांनी सीताबर्डी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पीडित मुलाची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर आरोपीविरुद्ध कलम 377 आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा विकृत मानसिकतेचे आहे का त्याचा तपास पोलीस करत आहे. सोबतच याशिवाय या आरोपीने आणखी काही मुलांवर हे कृत्य केले का हे देखील पोलीस तपासत आहेत.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Crime, Nagpur

पुढील बातम्या