नेहाल भुरे, प्रतिनिधी भंडारा, 2 एप्रिल : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. खूनाच्या, आत्महत्येच्या तसेच आर्थिक फसवणुकीच्याही घटना मोठ्या प्रमाणात सातत्याने समोर येत आहेत. त्यातच भंडारा जिल्हाच्या राष्ट्रीय महामार्गालगत खरबी (नाका) स्मशानभूमीमध्ये शुक्रवारी अर्धनग्न स्थितीत पोत्यात एका महिलेचा मृतदेह बांधलेल्या अवस्थेत आढळून आला होता.
मात्र, अद्यापही या मृत महिलेची अद्यापही ओळख पटलेली नाही. दोन दिवस ओलांडले तरी तिचा खून करून येथील स्मशानभूमीत मृतदेह आणण्यामागील रहस्यही अद्याप कायमच आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलीस तपास करीत आहे. खरबी (नाका) गावातील स्मशानभूमीमध्ये शेडखाली पांढऱ्या पॉलिथिन पिशवीत अर्धनग्न अवस्थेत हा मृतदेह आढळला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन आधी भंडाऱ्याच्या शवविच्छेदनगृहात पाठविला होता. मात्र, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नंतर नागपूरला रवाना केला. शुक्रवारी सायंकाळी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. यानंतर व्हिसेरा तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. एकासोबत अफेअर, कालांतराने दुसऱ्याकडे झुकला कल, शेवटी घडलं भयानक या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांचे शोधकार्य सुरू आहे. भंडारा जिल्ह्यात मिसिंगच्या तीन तक्रारी दाखल होत्या. मात्र, संबंधित नातेवाईक ओळख पटवू शकले नाही. या संदर्भात महामार्गावरील टोलनाक्यांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासणे सुरू केले आहे. सर्व जिल्ह्यांतील पोलीस ठाण्यांमध्ये या महिलेची छायाचित्रे पाठविली गेले आहे. घटनास्थळी आढळलेल्या पुराव्यांच्या दिशेनेही पोलिसांचा तपास सुरू आहे.