जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Gondiya News : महाराष्ट्रात अपघातांची मालिका सुरुच, आता मायलेकाचा मृत्यू, टिप्परच्या धडकेत गमावला जीव

Gondiya News : महाराष्ट्रात अपघातांची मालिका सुरुच, आता मायलेकाचा मृत्यू, टिप्परच्या धडकेत गमावला जीव

गोंदिया भीषण अपघात

गोंदिया भीषण अपघात

गोंदिया जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला.

  • -MIN READ Gondiya,Maharashtra
  • Last Updated :

रवी सपाटे, प्रतिनिधी गोंदिया, 6 जुलै : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. त्यातच आता आणखी एक भीषण अपघाताची घटना गोंदिया जिल्ह्यातून समोर आली आहे. टिप्परच्या धडकेत मायलेकांचा जागीच मृत्यू झाला. गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यातील कोरंभीटोला येथे हा भीषण अपघात घडला. तर मृत मायलेक हे भंडारा जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली आहे. काय आहे संपूर्ण बातमी - मोहन बांगरे (वय-24) आणि पुष्पकला बांगरे (वय-55) अशी मृतांची नावे आहेत. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील कोरंभीटोला येथे भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात मायलेकांचा जागीच मृत्यू झाला. मृत मोहन बांगरे हा आपल्या आईला घेऊन दुचाकीने नातेवाईकांकडे जात होता. मात्र, यावेळी कोरंभीटोला येथे भरधाव टिप्परने त्याच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती, की या धडकेत दोघांचाही जागीच मृत्यू. मृत मायलेक हे दोघेही भंडारा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. या भीषण अपघातानंतर टीप्पर शेतात पलटी झाला. तसेच चालक घटना स्थळावरून फरार झाला आहे. याप्रकरणी अर्जुनी मोरगाव पोलिसांनी नोंद केली आहे. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव येथे पाठविण्यात आले आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. पुण्यातही झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा भीषण अपघात - पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी दुपारी पुणे-नाशिक महामार्गावर हा अपघात झाला. आंबेगाव तालुक्यातील एकलहरे येथे हा अपघात झाला आहे. घटनेत आयुष प्रसाद यांच्या इनोव्हा कारला ट्रकने धडक दिली. या धडकेत इनोव्हा कारचे दोन्ही टायर फुटले. मात्र फक्त देव बलवत्तर म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद या अपघातातून वाचले. सुदैवाने त्यांच्यासोबत असलेले अंगरकक्षही या अपघातातून बचावले. पुण्यावरून जुन्नर येथे केंद्रीय सचिव दौऱ्यासाठी जात असताना ही घटना घडली आहे. मंचर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दाखल केली गेली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात