जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / वर्धा : शाळेसमोरुन अपहरण; धावत्या गाडीत 13 वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार

वर्धा : शाळेसमोरुन अपहरण; धावत्या गाडीत 13 वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

वर्धा जिल्ह्याच्या पुलगाव शहरात शाळेत जात असतानाच नराधम दोघांनी एका बालिकेचे चाकूचा धाक दाखवला.

  • -MIN READ Wardha,Maharashtra
  • Last Updated :

वर्धा, 23 ऑगस्ट : राज्यात दिवसेंदिवस अत्याचार, बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. नागपूरात फेसबुक फ्रेंडकडून अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता वर्धा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेसमोरुन अपहरण करुन एका 13 वर्षीय मुलीवर धावत्या गाडीत अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - वर्धा जिल्ह्याच्या पुलगाव शहरात शाळेत जात असतानाच नराधम दोघांनी एका बालिकेचे चाकूचा धाक दाखवला. यानंतर तिचे अपहरण करीत कारमध्ये बसवून धावत्या गाडीत लैंगिक अत्याचार केला. या घटनेने एकच खळबळ उडली असून समजमन सुन्न पडले आहे. या घटनेची माहिती पुलगाव पोलिसांना मिळाल्यानंतर पुलगाव पोलिसांनी दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पीडिता ही दररोज प्रमाणे घरुन शाळेत जाण्यासाठी निघाली होती. मात्र, शाळेत जात असतानाच तिला सुमेध मेश्राम नामक युवक आणि एका अनोळखी युवकाने आवाज दिला. पीडिता ही शाळे समोरील प्रवेशद्वाराजवळ थांबली असता आरोपी नराधम सुमेध याने चाकूचा धाक दाखवून तिला जबरदस्ती चारचाकी वाहनात जबरदस्ती खेचत नेत बसवले. यानंतर अनोळखी युवकाने चारचाकी समोर नेली. पीडिता ही आरडाओरड करीत होती. पण, कारच्या काचा बंद होत्या. सुमेधने पीडितेवर धावत्या कारमध्येच बळजबरी अत्याचार केला. तसेच ही बाब कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. हेही वाचा -  फेसबुक फ्रेंडकडून अल्पवयीन मुलींवर अत्याचार, नागपुरात घडल्या दोन धक्कादायक घटना पीडितेने सर्व आपबिती तिच्या घरच्यांना सांगितली असता आईने थेट पुलगाव पोलीस ठाणे गाठले. पीडितेच्या आईने सुमेध आणि एका मित्राविरुद्ध तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा केला आहे. पोलिसांनीही तत्काळ घटनेची दखल घेत आरोपींच्या शोधार्थ पथक रवाना केले आहे. दोन्ही नराधम आरोपी पोलिसांच्या रडारवर असून लवकरच दोघांनाही अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात