Home /News /agriculture /

Latest MSP for Kharif Crops : केंद्र सरकारकडून 14 खरीप पिकांच्या हमीभावात वाढ, नवीन दरात ‘या’ पिकांना झाला फायदा

Latest MSP for Kharif Crops : केंद्र सरकारकडून 14 खरीप पिकांच्या हमीभावात वाढ, नवीन दरात ‘या’ पिकांना झाला फायदा

खरीप पिकांच्या (kharif msp) किमान आधारभूत किमतीत (MSP) वाढ केली आहे. हा निर्णय पंतप्रधान मोदींच्या (pm narendra modi) अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळाने घेतला आहे.

  नवी दिल्ली, 09 जून : केंद्र सरकारने 2022-23 या पीक वर्षासाठी धान पीकासह अनेक खरीप पिकांच्या (kharif msp) किमान आधारभूत किमतीत (MSP) वाढ केली आहे. हा निर्णय पंतप्रधान मोदींच्या (pm narendra modi) अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळाने घेतला आहे. (Latest MSP for Kharif Crops) धान पिकाच्या एमएसपीमध्ये (msp) 100 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यंदाच्या हंगामात या पिकाची एमएसपी प्रति क्विंटल 2040 रुपये इतकी झाली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळ बैठकीत 14 खरीप पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. (Information and Broadcasting Minister Anurag Thakur)

  एमएसपी 92 रुपयांवरून 523 रुपये प्रति क्विंटलने वाढ करण्यात आली आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, एमएसपीमुळे शेतकऱ्यांना 50 ते 85 टक्के नफा मिळेल. सरकारने कामगार शुल्क, बैल किंवा यंत्र शुल्क, भाडेपट्ट्याचे भाडे, बियाणे, खत, सिंचन शुल्क, यंत्रसामग्री आणि शेत इमारतीचे अवमूल्यन, खेळत्या भांडवलावरील व्याज, तेल किंवा वीज खर्च, इतर खर्च आणि कौटुंबिक श्रम यांचा अंदाजपत्रकात समावेश केला आहे. सर्व पिकांची एमएसपी, खर्च आणि नफा यामध्येही बदल केले असल्याचे कृषी  मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

  हे ही वाचा : Monsoon महाराष्ट्रावर नाराज? कोकणासह, कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा जिल्ह्यांना IMDकडून वादळी पावसाचा Alert

  2021-22 च्या अंदाजानुसार, देशातील अन्नधान्य उत्पादन विक्रमी 314.5 दशलक्ष टन असल्याचा अंदाज आहे, मागच्या 2020-21 च्या अन्नधान्य उत्पादनापेक्षा 37.7 लाख टन जास्त आहे. 2021-22 मधील उत्पादन गेल्या पाच वर्षांच्या (2016-17 ते 2020-21) सरासरी अन्नधान्य उत्पादनापेक्षा 23.8 दशलक्ष टन जास्त झाल्याचे मंत्रालयाकडून माहिती देण्यात आली.

  मागच्या तीन वर्षांत चांगला पाऊस झाल्या असल्याने खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनात सरासरी २.८ टक्क्यांची वाढ झाली आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात गेल्या तीन वर्षांत वाढ होत असल्याने याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. दरम्यान, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी, तसेच कृषी क्षेत्राचा व्यापक विकास सुनिश्चित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या माध्यमातून गेल्या आठ वर्षांत सुरू केलेल्या अनेक योजनांचा आढावाही मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितला.

  हे ही वाचा : Petrol-Diesel Prices: पेट्रोल-डिझेलची किमत आज वाढली की कमी झाली? कंपन्यांकडून दर जारी

  अनुराग ठाकूर म्हणाले की, 2022-23 साठी खरीप हंगामासाठी 14 पिकासाठी किमान आधारभूत किंमतीत (MSP) वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2022-23 साठी धान पिकाचा एमएसपी 2040 रुपये प्रति क्विंटल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत धान पिकाच्या एमएसपीमध्ये 100 रुपये प्रति क्विंटल वाढ करण्यात आली आहे. तूरडाळीचा एमएसपी 6600 रुपये प्रति क्विंटल करण्यात आला आहे. गतवर्षीपेक्षा यामध्ये 300 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. तिळाच्या किंमतीत प्रति क्विंटल 523 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. तर मूग दाळ प्रति क्विंटल  480 रुपयांनी वाढली आहे. सूर्यफूलच्या किंमतीत 358 आणि भुईमूगाच्या किमतीत प्रति क्विंटल 300 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Farmer, Pm narenda modi

  पुढील बातम्या