नागपूर, 25 जानेवारी : विदर्भातील अष्टविनायकापैकी प्रमुख एक गणपती म्हणजे नागपुरातील सीताबर्डी टेकडी वरील टेकडी गणपती मंदिर हे होय. आज गणेश जयंती निमित्त मंदिर आकर्षक विद्युत रोषणाईने आणि फुलांची आरास करून मनमोहक रूपानं सजविण्यात आले आहे. आज विशेषत: अकराशे किलो बुंदीचा लाडू तयार करण्यात आला असून लाडूचा महाप्रसाद बाप्पाच्या चरणी अर्पण करण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणेच यंदा देखील मंदिराद्वारे भव्य शोभायात्राचे आयोजन करण्यात आले आहे. भाद्रपद महिन्यातील चतुर्थीप्रमाणेच माघ महिन्यातील चतुर्थीलाही तेवढेच महत्त्व आहे. नागपुरातील सीताबर्डीच्या टेकडीवर वसलेले प्राचीन गणेश टेकडी मंदिर म्हणजे तमाम नागपूरकरांचे आराध्यदैवत दैवत असून विदर्भातील अष्टविनायक पैकी एक प्रमुख स्थान आहे. शोभायात्रेचे आयोजन वर्षाला लाखो भाविकांपासून ते अनेक क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती त्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर जेव्हाही नागपूरला येतो तेव्हा टेकडीच्या गणेशाचे दर्शन घेतल्या शिवाय राहत नाही. प्राचीन गणेशाची विलोभनीय स्वयंभू मूर्ती तमाम नागपूरकरांचे श्रद्धास्थान असून पर्यटन आणि धार्मिक तीर्थक्षेत्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण आहे. या पार्श्वभूमीवर टेकडी गणेश मंदिराद्वारे दरवर्षीप्रमाणे यंदा देखील शोभायात्रा आयोजित करण्यात आली आहे. 1100 किलोचा लाडू अकराशे किलो बुंदीचा लाडू श्री अष्टविनायक मित्र मंडळातर्फे आज दुपारी 1 ते 4 वाजता दरम्यान बुंदीच्या लाडूचा महाप्रसाद भाविक भक्तांना प्रसाद म्हणून वितरित करण्यात येणार आहे. नागपूरचे आराध्यदैवत असलेले टेकडी गणपती मंदिर हे नागपूर रेल्वे स्थानका जवळुन अगदी हाकेच्या अंतरावर स्थित आहे. हे गणपती मंदिर हे नागपुरातील प्राचीन आणि अतिशय लोकप्रिय मंदिर असून मंदिर सीताबर्डीच्या टेकडीवर स्थित असल्याने त्याला टेकडी गणपती मंदिर असे म्हटले जाते. Maghi Ganpati 2023 : पंचमुखी दशभुजा गणेशाचं घ्या आज दर्शन, तुमचा दिवस जाईल प्रसन्न, Photos गणेशाची स्वयंभू मूर्ती नागपूरकर भोसल्यांच्या कार्यकाळात या मंदिराचा लौकिक सर्वत्र दृढ झाला. सीताबर्डी किल्ल्याच्या पूर्व उतारावर टेकडी गणेशाचे मंदिर आहे. गणेशची स्वयंभू मूर्ती उजव्या सोंडेची असून दोन पाय, चार हात, डोके,सोंड पूर्वी स्पष्ट दिसत असत मात्र दर मंगळवारी लावण्यात येणाऱ्या शेंदराच्या पुटांमुळे मूर्ती अलीकडील काळात स्पष्ट दिसत नाही. नागपूरचा आद्य गणपती अशी टेकडी गणेशाची ओळख आहे असून मनोकामना पूर्ण करणारा, इच्छित फल देणारा, संकट निवारक अशी भाविकांची श्रद्धा आहे. तसेच नवसाला पावणारा गणपती म्हणून या गणपतीची प्रति नागरिकांची अपार श्रद्धा आहे, अशी माहिती मंदिरातील पुजारी श्री पिंगळे यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







