मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

जनावरांना गोमूत्र पाजल्याने 'लम्पी' संसर्ग बरा होतो, नागपूरच्या संशोधकांचा दावा

जनावरांना गोमूत्र पाजल्याने 'लम्पी' संसर्ग बरा होतो, नागपूरच्या संशोधकांचा दावा

नागपूर जिल्ह्यातील देवलापार येथील ‘गो-विज्ञान अनुसंधान केंद्रा’च्या शास्त्रज्ञांनी लम्पीबाधित गुरांना गोमूत्र पाजून रोगमुक्त केले जाऊ शकते, असा दावा केला आहे.

नागपूर जिल्ह्यातील देवलापार येथील ‘गो-विज्ञान अनुसंधान केंद्रा’च्या शास्त्रज्ञांनी लम्पीबाधित गुरांना गोमूत्र पाजून रोगमुक्त केले जाऊ शकते, असा दावा केला आहे.

नागपूर जिल्ह्यातील देवलापार येथील ‘गो-विज्ञान अनुसंधान केंद्रा’च्या शास्त्रज्ञांनी लम्पीबाधित गुरांना गोमूत्र पाजून रोगमुक्त केले जाऊ शकते, असा दावा केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

तुषार कोहळे, नागपूर

नागपूर, 28 सप्टेंबर : गुरांमध्ये झपाट्य़ाने पसरणाऱ्या ‘लम्पी’ रोगाची साथ आटोक्यात आणण्यासाठी सरकारी यंत्रणा धडपडत आहे. संसर्ग पसरू नये यासाठी लसीकरणही सुरू करण्यात आलं आहे. असं असताना नागपूर जिल्ह्यातील देवलापार येथील ‘गो-विज्ञान अनुसंधान केंद्रा’च्या शास्त्रज्ञांनी मात्र लम्पीबाधित गुरांना गोमूत्र पाजून रोगमुक्त केले जाऊ शकते, असा दावा केला आहे. मात्र, डॉक्टरांनी याबद्दल केंद्र सरकार किंवा राज्यसरकारकडून कोणतीही सूचना मिळाली नसल्याचे सांगितले आहे.

लम्पीवर देशी उपाय

राज्यात सर्वत्र जनावरांमध्ये लम्पी रोगांचा सुळसुळाट पाहायला मिळत असून याचा संसर्ग थांबवण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. डॉक्टरांची मोठी टीम रोज हजारो जनावरांचे लसीकरण करत आहे. मात्र, नागपूर जिल्ह्यातील देवलापार येथील गोविज्ञान अनुसंधान केंद्राच्या संशोधकांनी दावा केला आहे की 'लम्पी’चा संसर्ग न झालेल्या गुरांचे मूत्र बाधित जनावरांना पाजले तर लम्पीग्रस्त जनावरांची प्रतिकारशक्ती वाढते व लम्पीरोग बरा होतो, असे या संशोधकांचे म्हणणे आहे. त्यांनी गोमूत्र देण्याची मात्रा देखील सांगितली आहे. बाधित मोठ्या जनावराला दिवसातून एकदा 100 मिलिलीटर व छोट्या जनावराला दिवसातून 50 मिलिलीटर गोमूत्र दिल्यास सात दिवसात ते जनावर रोगमुक्त होत असल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे.

वाचा - सावधान! नागपुरात पहिल्यांदाच वाढतोय हत्तीरोग, पाहा काय आहेत लक्षणं? Video

औषधी वनस्पतींचाही वापर

याशिवाय गुळवेल, हळद, अर्जुन (आजन), अडुळसा आणि कडुलिंब या वनस्पतींचे मिश्रण करून जनावरांना दिले. त्यांचा फायदा बाधित जनावरांना झाल्याचे आमच्या निदर्शनास आल्याचं या संशोधन केंद्राचा दावा आहे’. गोठ्य़ात रात्री कडुलिंब आणि शेणाचा धूर केल्यास कीटक नष्ट होतात. गोठे किंवा गुरे बांधण्याची जागा स्वच्छ ठेवली तर त्यांना असे आजार होणार नाहीत असाही दावा या गोविज्ञान अनुसंधान केंद्राच्या संशोधकांनी केला आहे. मागच्या दीड वर्षात साडेसहाशे जनावरांवर त्यांनी हा प्रयोग केल्यानंतर या निष्कर्षावर पोहचल्याचे संशोधक सुनील मानसिंगका सांगतात.

मात्र, केंद्र सरकार व राज्य सरकारने साथ रोग प्रतिबंधक उपाय योजनेत जो प्रोटोकॉल सांगितला आहे, त्यामध्ये गोमूत्राचा कुठेही उल्लेख नाही. महाराष्ट्र राज्य पशु विद्यापीठाने हा प्रोटकाल तयार करून दिलेला आहे. त्यामुळे सरकारने आखून दिलेल्या प्रोटोकॉलनुसारच उपचार पद्धती नागपूर जिल्ह्यात सुरू असल्याचे नागपूर जिल्ह्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी माहिती दिली.

गोमूत्र हे औषधी गुणधर्मामुळे प्रसिद्ध आहे. त्याचा आयुर्वेदामध्ये रोगांवर औषध म्हणून उपयोग केला जातो. मात्र, तेच गोमूत्र लम्पीसाठी जनावरांनाही फायद्याचे आहे की नाही हे केंद्र सरकारला ठरवायचे आहे.

First published:

Tags: Cow science, Serious diseases