मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /ऑनलाइन प्रेमात तरुणाची हद्द पार; नागपुरातील 17 वर्षीय मुलीसोबत घडला विचित्र प्रकार, वाचून बसेल धक्का

ऑनलाइन प्रेमात तरुणाची हद्द पार; नागपुरातील 17 वर्षीय मुलीसोबत घडला विचित्र प्रकार, वाचून बसेल धक्का

Crime in Nagpur: नागपुरातील बारावीच्या विद्यार्थिनीसोबत एक विचित्र प्रकार घडला आहे. सोशल मीडियावर अनोळखी तरुणावर प्रेम करणं तिला चांगलंच महागात पडलं आहे.

Crime in Nagpur: नागपुरातील बारावीच्या विद्यार्थिनीसोबत एक विचित्र प्रकार घडला आहे. सोशल मीडियावर अनोळखी तरुणावर प्रेम करणं तिला चांगलंच महागात पडलं आहे.

Crime in Nagpur: नागपुरातील बारावीच्या विद्यार्थिनीसोबत एक विचित्र प्रकार घडला आहे. सोशल मीडियावर अनोळखी तरुणावर प्रेम करणं तिला चांगलंच महागात पडलं आहे.

नागपूर, 10 जानेवारी: गेल्या काही दिवसांपासून नागपूरसह (Nagpur) राज्यात सायबर गुन्ह्यात (Cyber crime) प्रचंड वाढ झाली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामुळे सुरू केलेल्या ऑनलाइन शिक्षणामुळे अल्पवयीन मुला-मुलींकडे स्मार्टफोन आले आहेत. पण या स्मार्टफोनचा आता भलत्याच कारणासाठी वापर होतं असल्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत. सोशल मीडियाची योग्य जाण नसल्याने अल्पवयीन मुलं-मुली सोशल मीडियावरील अनोळखी व्यक्तीच्या प्रेमात सहजपणे (Love affair on social media) पडत आहेत. अशीच एक घटना नागपुरात घडली आहे.

नागपुरातील बारावीच्या विद्यार्थिनीची काही दिवसांपूर्वी स्नॅप चॅटवर (SnapChat) एका तरुणाशी ओळख झाली होती. या ओळखीचं रुपांतर मैत्रीत आणि त्यानंतर दोघांचही ऑनलाइन प्रेम बहरलं होतं. हे प्रेम इतकं पुढं गेलं की पीडित मुलीने आपले न्यूड व्हिडीओ (Sent nude videos) आपल्या प्रियकराला पाठवले. पण हीच चूक तिला भलतीच महागात पडली आहे. संबंधित युवकाने पीडित मुलीला ब्लॅकमेलिंक करायला सुरुवात केली. आरोपीनं संबंधित व्हिडीओ पीडितेच्या जवळच्या व्यक्तीला पाठवून तिला त्रास द्यायला सुरुवात केली आहे.

हेही वाचा- परभणी: शनिवारची रात्र ठरली काळरात्र; नवविवाहित जोडपं झोपेतून उठलंच नाही, हृदयद्रावक शेवट

या घटनेची माहिती पीडित मुलीच्या वडिलांना कळाल्यानंतर, युवतीने मानकापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 वर्षीय पीडित मुलगी मानकापूरमध्ये राहते. वर्षभरापूर्वी तिची ओळख रितिक मिश्रा नावाच्या एका तरुणाशी झाली होती. स्नॅप चॅटवर ओळख झाल्यानंतर त्यांचं ऑनलाइन प्रेम बहरत गेलं. ते सतत एकमेकांच्या संपर्कात राहू लागले. यानंतर पीडित मुलीने आरोपी तरुणाला न्यूड व्हिडीओ पाठवले.

हेही वाचा-11 वीतील मुलाच्या आत्महत्येमागे Instagram ठरलं कारणं; कुटुंबाला बसला जबर धक्का

यानंतर आरोपीची मागणी वाढतच गेली. त्यामुळे पीडित मुलीने त्याला टाळायला सुरुवात केली. हे पाहून आरोपीनं पीडित मुलीला ब्लॅकमेलिंग करायला सुरुवात केली. यामुळे पीडित मुलीने आरोपीला ब्लॉक केलं. यानंतर आरोपीनं संबंधित न्यूड व्हिडीओ पीडित मुलीच्या एका नातेवाईकाला पाठवला आणि तिला बोलायला सांग अन्यथा याचे परिणाम गंभीर होतील, अशी धमकी दिली. संबंधित नातेवाईकाने हा व्हिडीओ पीडित मुलीला आणि तिच्या आई वडिलांना दाखवला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित मुलीने मानकापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलीस तपास करत असून तो ओडिशा येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे.

First published:

Tags: Crime news, Nagpur