पुणे, 26 जानेवारी : : एम्प्रेस बोटॅनिकल गार्डनतर्फे 26 ते २९ जानेवारी दरम्यान पुष्प प्रदर्शनाचे आयोजन कारण्यात आले आहे.
2/ 6
या प्रदर्शनात विविध फुले, भाजीपाला, बोन्साय अशा स्पर्धा आयोजित केल्या आहेत. कर्नाटक, आंध्र प्रदेश, सिक्कीममधून विक्रेते यामध्ये सहभागी झाले आहेत.
3/ 6
यावर्षी जपानी पद्धतीने साकारलेल्या विविध पुष्परचना तसेच बोन्साई वृक्षांचे विविध प्रकार या ठिकाणी पुणेकरांना पाहता येतील.
4/ 6
ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेमार्फत निसर्गाबद्दल आपुलकी निर्माण व्हावी या उद्देशाने या प्रकारचे पुष्पप्रदर्शन भरवले जाते.
5/ 6
या पुष्पप्रदर्शनात फक्त फुलांचा समावेश न करता निरनिराळ्या प्रकारच्या शोभिवंत झाडांच्या कुंड्या, भाजीपाला, पुष्परचना, बागेच्या प्रतिकृती ठेवण्यात आल्या आहेत.
6/ 6
थंडीच्या आल्हादायक वातावरणात वेगवेगळ्या फुलांनी नटलेली एम्प्रेस गार्डन पाहण्याची संधी पुणेकरांना या निमित्तानं मिळाली आहे.