मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /यवतमाळ : सोनं लूटून घरी आली अन् बिछान्यात घडला भयानक प्रकार, मुलीचा जागीच मृत्यू

यवतमाळ : सोनं लूटून घरी आली अन् बिछान्यात घडला भयानक प्रकार, मुलीचा जागीच मृत्यू

दसऱ्याच्या आनंदाचे रूपांतर अत्यंत भयानक घटनेत झाले.

दसऱ्याच्या आनंदाचे रूपांतर अत्यंत भयानक घटनेत झाले.

दसऱ्याच्या आनंदाचे रूपांतर अत्यंत भयानक घटनेत झाले.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Yavatmal, India

रवी गुलकरी, प्रतिनिधी

यवतमाळ, 7 ऑक्टोबर : यवतमाळमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दसऱ्याच्या दिवशी ही दुर्घटना घडली. सोने लूटून दमलेली एक मुलगी घरी आल्यावर झोपली. मात्र, रात्री झोपलेल्या अवस्थेत तिचा सर्पदंश झाला. यामुळे या मुलीचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

दसऱ्याच्या आनंदाचे रूपांतर अत्यंत भयानक घटनेत झाले. दसऱ्याला सोने लुटून घरी पोहोचलेल्या 13 वर्षीय वैष्णवी भुरवले हिचा बिछान्यात सापाने दंश केल्याने मृत्यू झाला. ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील ढाकणी गावातील आहे. वैष्णवी ही इयत्ता 7वी ची विद्यार्थिनी होती.

वैष्णवीच्या घराजवळ खूप कचरा पडलेला आहे. या कचऱ्यात कीटक- झुरळ-बेडूक वगैरे आहेत. याठिकाणाहूनच सापाने घरात प्रवेश केला असेल, असा अंदाज लावण्यात येत आहे. सर्पदंशानंतर वैष्णवी जोरात ओरडली. यानंतर तिच्या आई वडिलांना समजले की तिला सर्पदंश झाला आहे. सर्पदंश दिसत होता. यामुळे तिला लगचेच तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र, दुर्दैवाने उपचाराआधीच तिचा मृत्यू झाला. दसऱ्याच्या दिवशी घडलेल्या या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

पावसाळ्यात 'सर्पदंश' होऊ नये म्हणून काय काळजी घ्याल?

घाटी रुग्णालयातील मेडीसीन विभागाच्या विभागप्रमुख डॉ. मिनाक्षी भट्टाचार्य सांगतात की, “सर्प हा मानवाला मुद्दाम दंश करत नाही. त्याला असुरक्षित वाटते तेव्हा तो माणसांना दंश करत असतो. सर्पदंश झाल्यास नागरिकांनी घाबरून जाऊ नये. संबंधित व्यक्तीला एकाच ठिकाणी बसवून तात्काळ सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करावे. यामुळे रुग्णाचा मृत्यूचा धोका टाळता येऊ शकतो.”

हेही वाचा - Snake Bite : पावसामुळे साप आले बाहेर; दोन दिवसात तब्बल 17 शेतकऱ्यांना सर्पदंश, आरोग्य यंत्रणेची तारांबळ

अशी घ्या काळजी

1) घरापासून सापांना दूर ठेवण्यासाठी कार्बनिक एसिड आणि फिनाईल घराच्या आसपास शिंपडल्यास तुम्ही सापांना दूर ठेवू शकता.

2) तुम्हाला शक्य असेल तर केरोसीन देखील तुम्ही घराच्या आसपास सिंपडू शकता.

3) घराच्या आसपासचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवा.

4) शेतात खाली झोपत असलातर तुम्ही दोन इंच वरती झोपता येईल अशी सोय करावी. यामुळे साप आला तरी तो सहज निघून जाईल.

5) शेतातील पेंढ्या किंवा अडचणीच्या ठिकाणी हात टाकताना अगोदर चाचणी करा. आवाज केल्याने साप निघून जाईल आणि त्यानंतरच तुम्ही तिथे हात टाका.

First published:
top videos

    Tags: Girl death, Yavatmal news