यवतमाळ, 18 जुलै : राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक नद्या, नाल्यांना पूर आले आहे. विदर्भात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यातच आता यवतमाळ जिल्ह्यातून एक बातमी समोर आली आहे. बेंबळा प्रकल्पाच्या विसर्गामुळे बेंबळा नदीला पूर आला आहे. यामुळे याठिकाणी नदी पात्रात एका झाडावर दोन जण अडकून पडले. प्रशासनाचे पथक दाखल - यवतमाळ जिल्ह्यात सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे नद्यांची पातळी वाढली आहे. त्यात शेतामध्ये काम करण्यासाठी दोघे गेले होते. मात्र, अचानक बेंबळा नदीची पाणी पातळी वाढल्याने या दोघांनीही जीव वाचविण्यासाठी एका झाडाचा सहारा घ्यावा लागला आहे. ही बाब काही नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधला आणि याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. तसेच बचावकार्य सुरू झाले. दरम्यान, हे दोन जण अडकल्याचा व्हिडिओही समोर आला आहे.
हेही वाचा - आधी चिखलदऱ्याला घेऊन गेला अन्…; नागपुरातील पोलिसाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात झाली. यानंतरचे काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागात जोरदार पाऊस झाला. यामुळे नद्या, नाल्यांना पुर आले. तर काही धरणेही भरली. तसेच राज्यात झालेल्या या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. इतकंच नव्हे तर अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. हवामान खात्याचा इशारा - राज्यातील पावसाची परिस्थिती कशी राहणार, याबाबत हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. पुढील 4, 5 दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढू शकतो. तसेच येत्या 3 दिवसांत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे, असे हवामान खात्याने म्हटले काल रविवारी म्हटले आहे.