जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Gold-Silver Rate Today in Nagpur: लग्नासाठी सोनं घ्यायचं आहे? लगेच चेक करा नागपुरातील दर

Gold-Silver Rate Today in Nagpur: लग्नासाठी सोनं घ्यायचं आहे? लगेच चेक करा नागपुरातील दर

Gold-Silver Rate Today in Nagpur: लग्नासाठी सोनं घ्यायचं आहे? लगेच चेक करा नागपुरातील दर

Gold-Silver Rate Today in Nagpur : सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किमती सतत बदलत आहेत. नागपुरातील दर काय आहेत जाणून घ्या.

  • -MIN READ Nagpur,Maharashtra
  • Last Updated :

    विशाल देवकर, प्रतिनिधी नागपूर, 14 फेब्रुवारी: भारतात लग्नसराईत मोठ्या प्रमाणात सोने-चांदीची खरेदी होत असते. येत्या काही काळात लग्नसराईचा हंगाम सुरु होणार आहे. त्यामुळे आतापासूनच सोने-चांदीची खरेदी सुरू झाली आहे. आपणही सराफा बाजारात सोने खरेदीसाठी जाण्याचा विचार करत असाल, तर आज नागपूरमध्ये सोने 57 हजार 300 रुपये प्रती तोळा तर चांदी 67 हजार 100 रुपये प्रति किलो आहे. जाणकारांचा सल्ला गेल्या काही काळात सोने-चांदीचे दर सातत्याने वाढत आहेत. ही दरवाढ पुढे देखील कायम राहणार आहे. त्यामुळे सोने-चांदीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा योग्य काळ असल्याचे जाणकारांचे मत आहे. महाराष्ट्रात आधिक मासात मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी होत असते. दरम्यान, नागपूरमधील सराफा बाजारात आतापासूनच सोने खरेदीला सुरुवात झाली आहे. Gold-Silver Rate Today in Nashik : सोने खरेदीची करा लगबग, नाशिकमध्ये झाली घसरण सोन्याचे दर वाढणार जगभरातील सोन्या-चांदीच्या खरेदी विक्रीचा भारतीय बाजारपेठेवर परिणाम होत असतो. दक्षिण आफ्रिकेसारख्या मोठ्या बाजारपेठांमधून सध्या सोने कमी प्रमाणात विकले जात आहे. सर्वच देश सोने-चांदी स्टॉक करत आहे. त्यामुळे किमतीत खात्रीशीर वाढ होण्याची शक्यता आहे. भविष्यात सोने प्रति तोळा 80 तर चांदी प्रति किलो 75 हजार रुपये पार करेल. त्यामुळे सोने चांदीची खरेदी करण्यासाठीचा हा उत्तम काळ असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले. नागपूर शहरातील आजचे सोन्या-चांदीचे दर. नागपूर शहरातील सोन्याचे दर (10 ग्रॅम) 10 ग्रॅम 24 कॅरेट - 57,300 10 ग्रॅम 22 कॅरेट- 54,400 10 ग्रॅम 18 कॅरेट- 45,800 नागपूर शहरातील सोन्याचे दर (1 ग्रॅम) 1 ग्रॅम 24 कॅरेट - 5,730 1 ग्रॅम 22 कॅरेट- 5,440 1 ग्रॅम 18 कॅरेट- 4,580 चांदीचे दर प्रतिकिलो - 67,100 नागपूर शहरातील कालचे सोन्या-चांदीचे दर. नागपूर शहरातील सोन्याचे दर (10 ग्रॅम) 10 ग्रॅम 24 कॅरेट - 57,100 10 ग्रॅम 22 कॅरेट- 54,600 10 ग्रॅम 18 कॅरेट- 52,600 10 ग्रॅम 20 कॅरेट- 51,600 नागपूर शहरातील सोन्याचे दर (1 ग्रॅम) 1 ग्रॅम 24 कॅरेट - 5,710 1 ग्रॅम 22 कॅरेट- 5,460 1 ग्रॅम 18 कॅरेट- 5,260 1 ग्रॅम 20 कॅरेट- 5,160 चांदीचे कालचे दर प्रतिकिलो - 66,700 (टीप : सोन्याच्या पेढ्यांमधील मजुरी, जकात शुल्क, राज्य कर, वाहतूक खर्च, GST या सारख्या वेगवेगळ्या कारणांनुसार सोन्याची किंमत प्रत्येक दुकानामध्ये वेगळी असू शकते. आम्ही शहरातील सर्वसाधरण भाव देत आहोत.)

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात