विशाल देवकर, प्रतिनिधी
नागपूर, 24 मे: सध्या राज्यात लग्नसराईची धामधूम सुरू आहे. या काळात मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीच्या दागिन्यांची खरेदी होत असते. गेल्या काही काळापासून सोन्या-चांदीच्या दरात झपाट्याने वाढ होत होती. हीच दरवाढ आज देखील कायम असल्याने आज पुन्हा एकदा नागपूरकरांची काहीशी निराशा झाली आहे. मंगळवारच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात 300 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे नागपूरकरांना 24 कॅरेट सोन्यासाठी प्रति तोळा 61 हजार 100 रुपये मोजावे लागणार आहेत. तर 22 कॅरेट सोन्यासाठी प्रतितोळा 58 हजार रुपये द्यावे लागतील.
चांदीच्या दरात झाली घट
महिला वर्गाकडून सोन्यासोबतच चांदीच्या दागिन्यांनाही मोठी मागणी असते. गेल्या महिन्याभराचा विचार करता चांदीचे दरही झपाट्याने वाढले आहेत. तसेच गेल्या आठवड्यातही चांदीच्या दरात सातत्याने वाढ झाली. मात्र आठवड्याच्या सुरुवाती पासून आज सलग तिसऱ्या दिवशी चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. आज चांदीच्या दरात मंगळवारच्या तुलनेत 300 रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना नागपूरच्या सराफा बाजारात प्रति किलो चांदीसाठी 72 हजार 100 रुपये मोजावे लागणार आहेत.
गुंतवणुकीचा चांगला पर्याय सोनं
भारतीय लोकांना सोन्या-चांदीचं मोठं आकर्षण आहे. सण, उत्सव आणि घरगुती समारंभात लोक आवर्जुन सोनं खरेदी करतात. सध्या लग्नसराईचा काळ असल्यानं सराफा बाजारात गर्दी आहे. तसेच सोन्याकडे गुंतवणुकीसाठी एक उत्तम पर्याय म्हणूनही पाहिलं जातं. त्यामुळे अनेकजण सोन्यात गुंतवणूक करत असतात. पुढील काळात सोन्याची किंमती आणखी वाढण्याची शक्यता असल्याने सोनं गुंतवणुकीचा सल्ला दिला जात आहे.
Gold Price in Pune : आज सोनं खरेदीचा विचार करताय? पुण्यातील दर आधी चेक करा
नागपूर शहरातील आजचे सोन्याचे दर (10 ग्रॅम)
10 ग्रॅम 24 कॅरेट - 61,100
10 ग्रॅम 22 कॅरेट- 58,000
10 ग्रॅम 20 कॅरेट- 53,200
10 ग्रॅम 18 कॅरेट- 48,900
नागपूर शहरातील सोन्याचे दर (1 ग्रॅम)
1 ग्रॅम 24 कॅरेट - 6,110
1 ग्रॅम 22 कॅरेट- 5,800
1 ग्रॅम 20 कॅरेट- 5,320
1 ग्रॅम 18 कॅरेट-. 4,890
चांदीचे दर प्रतिकिलो - 72,100
प्लॅटिनम 40,000
नागपूर शहरातील कालचे सोन्याचे दर (10 ग्रॅम)
10 ग्रॅम 24 कॅरेट - 60,800
10 ग्रॅम 22 कॅरेट- 57,800
10 ग्रॅम 20 कॅरेट- 54,200
10 ग्रॅम 18 कॅरेट- 48,600
नागपूर शहरातील सोन्याचे दर (1 ग्रॅम)
1 ग्रॅम 24 कॅरेट - 6,080
1 ग्रॅम 22 कॅरेट- 5,780
1 ग्रॅम 20 कॅरेट- 5,420
1 ग्रॅम 18 कॅरेट-. 4,860
चांदीचे दर प्रतिकिलो - 72,400
प्लॅटिनम 40,000
(टीप : सोन्याच्या पेढ्यांमधील मजुरी, जकात शुल्क, राज्य कर, वाहतूक खर्च, GST या सारख्या वेगवेगळ्या कारणांनुसार सोन्याची किंमत प्रत्येक दुकानामध्ये वेगळी असू शकते. आम्ही शहरातील सर्वसाधरण भाव देत आहोत.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gold and silver prices today, Gold prices today, Local18, Nagpur, Nagpur News