जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Gold Price in Nagpur : आज सोनं खरेदीचा विचार करताय? बाजारात जाण्यापूर्वी चेक करा नागपुरातील दर

Gold Price in Nagpur : आज सोनं खरेदीचा विचार करताय? बाजारात जाण्यापूर्वी चेक करा नागपुरातील दर

Gold Price in Nagpur : आज सोनं खरेदीचा विचार करताय? बाजारात जाण्यापूर्वी चेक करा नागपुरातील दर

Gold Price in Nagpur: अक्षय्य तृतीयेनंतर सोन्या-चांदीच्या दरात वाढ होत आहे. सोन्या-चांदीची खरेदी करणार असाल तर नागपुरातील दर पाहा.

  • -MIN READ Nagpur,Maharashtra
  • Last Updated :

    विशाल देवकर, प्रतिनिधी नागपूर, 25 एप्रिल : भारतात सण, उत्सव, समारंभात लोक सोनं खरेदी करत असतात. नुकतंच अक्षय्य तृतीयेला सोनं चांदी खरेदीसाठी ग्राहकांनी सराफा बाजारात गर्दी केली होती. आता अक्षय्य तृतीयेनंतर सराफा बाजारातील सोन्याच्या दरात वाढ होताना दिसते आहे. आज सोमवारच्या तुलनेत 24 कॅरेट सोन्याचा दरात 200 रुपयांची वाढ झाली आहे. नागपुरात 24 कॅरेट सोन्याचा दर आज 60 हजार 700 रुपये प्रती 10 ग्रॅम झाला आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 57 हजार 700 रुपये प्रती 10 ग्रॅम रुपये आहे. नागपुरातील चांदीच्या दरात लक्षणीय वाढ भारतीय लोकांना सोन्या-चांदीचं मोठं आकर्षण आहे. सण, उत्सव, समारंभात लोक सोन्या-चांदीची खरेदी आवर्जून करतात. आंतरराष्ट्रीय बाजारानुसार सोन्यासोबत चांदीच्या दरातही चढ-उतार होत असतात. महिला वर्गाची चांदीच्या दागिन्यांनाही पसंती असते. गेल्या महिन्याभराचा विचार करता चांदीचे दरही झपाट्याने वाढले आहेत. सोमवारी आठवड्याच्या सुरवातीला चांदीचा दर 74,600 रुपये प्रतिकिलो होता. त्यात आता तब्बल 500 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे आज चांदी 75 हजार 100 रुपये प्रतिकिलो मिळणार आहे.

    News18लोकमत
    News18लोकमत

    गुंतवणुकीसाठी सोनं चांगला पर्याय भारतीय बाजारपेठेत सोन्या-चांदीचे दर रोज बदलतात. सोन्या-चांदीकडे उत्तम गुंतवणुकीचा पर्याय म्हणूनही पाहिले जाते. परंतु, गेल्या काही काळात सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आगामी काळात देखील सोन्या चांदीच्या दर कमी जास्त होऊ शकते असा अंदाज चंबोळे ज्वेलर्सचे संचालक पंकज चंबोळे यांनी वर्तीवला आहे. Gold Price in Pune : पुणेकरांना दिलासा नाहीच, पाहा कितीनं वाढले सोन्याचे दर नागपूर शहरातील आजचे सोन्याचे दर (10 ग्रॅम) 10 ग्रॅम 24 कॅरेट - 60,700 10 ग्रॅम 22 कॅरेट- 57,700 10 ग्रॅम 20 कॅरेट- 54,800 10 ग्रॅम 18 कॅरेट- 48,600 नागपूर शहरातील सोन्याचे दर (1 ग्रॅम) 1 ग्रॅम 24 कॅरेट - 6,070 1 ग्रॅम 22 कॅरेट- 5,770 1 ग्रॅम 20 कॅरेट- 5,480 1 ग्रॅम 18 कॅरेट-. 4,860 चांदीचे दर प्रतिकिलो - 75,100 प्लॅटिनम 40,000 नागपूर शहरातील कालचे सोन्याचे दर (10 ग्रॅम) नागपूर शहरातील सोन्याचे दर (10 ग्रॅम) 10 ग्रॅम 24 कॅरेट - 60,500 10 ग्रॅम 22 कॅरेट- 57,500 10 ग्रॅम 20 कॅरेट- 49,250 10 ग्रॅम 18 कॅरेट- 48,400 नागपूर शहरातील सोन्याचे दर (1 ग्रॅम) 1 ग्रॅम 24 कॅरेट - 6,050 1 ग्रॅम 22 कॅरेट- 5,750 1 ग्रॅम 20 कॅरेट- 4,925 1 ग्रॅम 18 कॅरेट-. 4,840 चांदीचे दर प्रतिकिलो - 74,600 प्लॅटिनम 40,000 (टीप : सोन्याच्या पेढ्यांमधील मजुरी, जकात शुल्क, राज्य कर, वाहतूक खर्च, GST या सारख्या वेगवेगळ्या कारणांनुसार सोन्याची किंमत प्रत्येक दुकानामध्ये वेगळी असू शकते. आम्ही शहरातील सर्वसाधरण भाव देत आहोत.)

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात