अमरावती, 20 जानेवारी : मेळघाटात हत्तींवरुन जंगल सफारी करण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात. पण सध्या ही सफारी बंद आहे कारण मेळघाटातील हत्ती सध्या सुट्टीवर आहेत. दरवर्षी या काळात हत्तींना आराम देऊन त्यांच्या पायांना चॉपिंग केलं जातं. पण हे चॉपिंग म्हणजे नेमकं काय? पाहूयात
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पअंतर्गत कोलकास संकुल येथील हत्ती सफारी 10 ते 25 जानेवारीदरम्यान 15 दिवस चॉपिंगकरिता बंद ठेवण्यात आली आहे. कोलकास संकुल येथे लक्ष्मी, जयश्री, चंपाकली आणि सुंदरमाला अशा या चार हत्तीणी आहेत. वर्षभर त्या हत्ती सफारीकरिता पर्यटकांच्या सेवेत उपलब्ध असतात. मात्र, वर्षातील हिवाळा ऋतूमध्ये 15 दिवस त्यांना आरामासाठी सुटी दिली जाते.
यादरम्यान त्यांच्या पायाची विविध प्रकारच्या जडीबुटी एकत्र करून चॉपिंग केली जाते. चॉपिंग ही त्यांच्याकरिता एकप्रकारे आयुर्वेदिक मसाज आहे. या 15 दिवसांमध्ये सफारी आणि इतर कामे हत्तींना दिले जात नाही, अशी माहिती येथील वनरक्षकांनी दिली आहे.
हेही वाचा - 'मुख्यमंत्र्यांनाही एवढ्या जिल्ह्यांची नावं माहिती नसतील'; चिमुकल्याच्या video ने सगळेच थक्क
वर्षभर पर्यटकांना सेवा देणारे हत्तींना देखील आरामाची गरज असते. म्हणून या चॉपिंगमुळे हत्तींचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यदेखील चांगलं राहत असल्याचे वन्यजीव अभ्यासक यादव तरटे यांनी सांगितले. दरम्यान, सध्या हत्तीच्या पायांची चॉपिंगनंतर, 25 जानेवारी नंतर पुन्हा एकदा हत्ती सफारी सुरू केली जाणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.