नवी दिल्ली, 20 जानेवारी : आजकालचे लहान मुलं आणि मुली खूप हुशार झाले आहेत. अगदी लहान वयात मोबाईल वापरणं असो किंवा अभ्यास असो ते आपलं कौशल्य दाखवत असतात. लहान वयात त्यांचं कौशल्य पाहून अनेकदा लोक भारावून जातात. एवढ्याशा वयात त्यांना वेगळं आणि हटके काही करताना पाहून लोक त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव करतात. अशाच एका चिमुकल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे काही विद्यार्थी शाळेत चालले आहेत. यापैकी एका शिवांश नावाच्या विद्यार्थ्याला थांबवत विचारलं जातं की, तू उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्ये प्रदेशच्या जिल्ह्यांची नावं सांगितली आहेत तर तू महाराष्ट्रातील जिल्ह्यांची नावं सांगू शकतोस का? यावर शिवांश म्हणतो, हो सांगू शकतो. त्यानंतर शिवांश एक एक करुन महाराष्ट्रातील जिल्ह्यांची नावं सांगायला सुरुवात करतो. त्याचं स्पीड आणि हुशारी पाहून सगळेच थक्क झाले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत असून या चिमुकल्या शिवांशचं कौतुक करत आहेत.
अमराठी मुलाला महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांती नावं तोंडपाठ असल्याचं पाहून अनेकांनी आश्चर्य झालं आहे. अगदी काही वेळात सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला. त्याच्या टॅलेंटचं कौतुक होत असून व्हिडीओवर अनेक प्रतिक्रया येत आहेत. विशेष गोष्ट म्हणजे त्याने औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख केला. यामुळे त्याने अनेक नेटकऱ्यांचं मन जिंकलं आहे. काहीजण कमेंट करत म्हणत आहे की, मुख्यमंत्र्यांनाही एवढ्या जिल्ह्यांची नावं माहिती नसतील.
दरम्यान, सोशल मीडियावर चिमुकल्यांचे आणि त्यांच्या हुशारीचे अनेक व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत असलेले पहायला मिळतात. एवढ्याशा वयात असलेलं त्यांचं टॅलेंट पाहून त्यांना प्रोत्साहन आणि कौतुकाची थाप मिळते. विद्यार्थ्यांचे विविध ठिकाणचे व्हिडीओ सोशल मीडियावर गराळा घालत असतात.