उदय तिमांडे, प्रतिनिधी नागपूर, 16 जानेवारी : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. नागपुरातही गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यातच आता नागपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कौटुंबिक कलहातून स्वतःच्याच मुलांना विष दिल्यानंतर बापानेही नंतर धक्कादायक पाऊल उचलत आत्महत्या केली. यात 7 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. तर मुलगा सुदैवाने यामध्ये बचावला. काय आहे संपूर्ण प्रकरण - नागपूरच्या वाठोड्यातील वैष्णव देवी नगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. पत्नीसोबत झालेल्या वादातून एका व्यक्तीने आपल्या दोन निरागस मुलांच्या जेवणात विष मिसळून त्यांची हत्या केली. त्यानंतर आरोपीने गळफास लावून आत्महत्या केली. नागपूर शहरातील वाठोडा पोलीस ठाण्यांतर्गत वैष्णवदेवी नगरात ही धक्कादायक घटना घडली. 45 वर्षीय मनोज बेले असे आरोपीचे नाव आहे. मनोजचा त्याची पत्नी प्रियासोबत कौटुंबिक वाद सुरू होता. त्यामुळे दोघे विभक्त राहत होते. 12 वर्षांचा मुलगा प्रिन्स आणि 7 वर्षांची मुलगी तनिष्का त्यांच्या आईसोबत राहत होते. मात्र,दोन्ही मुले आठवड्यातून एकदा वडिलांना भेटायला जायची. हेही वाचा - बैलगाडीला धडकली दुचाकी, जालन्यात महिला कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू तर मुलगा… रविवार मुलांचे आजोबा त्यांना वडिलांकडे सोडून गेले. यानंतर आरोपी मनोजने मुलांना विष देऊन ठार मारले. दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्याचे असे त्याला वाटल्यानंतर आरोपीने घरात गळफास घेत आत्महत्या केली. यात 7 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. तर मुलगा सुदैवाने यामध्ये बचावला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळभळ उडाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.