जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Video : नोकरी सोडून सुरू केला व्यवसाय, सरकारी पाठबळावर लाखोंची कमाई!

Video : नोकरी सोडून सुरू केला व्यवसाय, सरकारी पाठबळावर लाखोंची कमाई!

Video : नोकरी सोडून सुरू केला व्यवसाय, सरकारी पाठबळावर लाखोंची कमाई!

व्यवसायाला मोठं रूप देण्यासाठी सरकारी योजनेतून भांडवल मिळवलं आणि रेस्टॉरंट थाटलं.

  • -MIN READ Local18 ahmednagar,maharashtra
  • Last Updated :

    अहमदनगर, 09 डिसेंबर : खासगी नोकरीच्या पगारातून घर चालवणं तसं कठीण काम. त्यामुळे नगर च्या एका तरुणानं नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय करण्याचं ठरवलं. भेळची आवड असल्यानं आपण चांगल्याप्रकारे भेळ बनवू शकतो या आत्मविश्वासावर तरुणानं भेळचा गाडा सुरू केला. हळूहळू व्यवसाय चांगला चालला. या व्यवसायाला मोठं रूप देण्यासाठी सरकारी योजनेतून भांडवल मिळवलं आणि रेस्टॉरंट थाटलं. आता या व्यवसायातून लाखोंची कमाई होत आहे.   कोणताही व्यवसाय सुरू करताना सुरुवातीला अनेक अडीअडचणी येतात. व्यवसायात बऱ्याचदा नफा तोट्याला सामोरे जावं लागतं. आपला स्वतःचा छोटासा का होईना व्यवसाय असावा, असं प्रत्येकाला वाटतं. मात्र, व्यवसाय सुरू करताना, सर्वात मोठी अडचण येते ती म्हणजेच भांडवलाची. अश्यावेळी सरकारच्या काही योजनांची मदत मिळू शकते. अशाच योजनेचा फायदा घेत यशस्वी व्यावसायिक बनलेल्या नगरच्या तरुणाची ही यशोगाथा. केरळी हॉटेलमध्ये मिळते फेमस कोल्हापूरी डिश, पाहा Recipe Video  सरकारी योजनेचा फायदा अहमदनगर मधील विश्वास आणि किरण या दोघा भावांनी आपला स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू केला. मार्केट यार्ड येथील महात्मा फुले चौकात फूड ट्रक तर नगर - पुणे महामार्ग वर भेळ सेंटर सुरू केले. सुरुवातीला हातगाडीवरती भेळ विक्री सुरू केली. त्यानंतर व्यवसायात प्रगती होत गेली आणि स्वतःच सुंदर असं मोठं रेस्टॉरंट सुरू केलं. व्यवसाय वाढीसाठी भांडवलाची गरज भासू लागली. मग यासाठी काही सरकारी योजनेचा लाभ मिळू शकेल का याची शोधाशोध सुरू असताना PMEJP या योजनेतून मधून अनुदान मिळालं. दहा लाख अनुदान मिळवून त्यांनी आपल्या व्यवसायात बदल केले. जबाबदारीतून व्यवसायांची सुरुवात वडिलांचं अचानक निधन झालं घराचा पूर्णपणे भार विश्वास याच्यावरती आला. नोकरीतून घर चालत नव्हते त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आपण काही तरी  छोटासा व्यवसाय सुरू करावा असे त्यांना वाटलं आणि त्यामुळे त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली. सुरुवातीला हात गाडीवरती ते भेळ विकू लागले. त्यांच्या भेळला चांगला प्रतिसाद मिळू लागला.   दुर्गम भागातील तरुणानं सुरू केला आयुर्वेदिक चहाचा व्यवसाय, इतरांसाठी बनला आदर्श हळूहळू फूड ट्रक त्यानंतर मुख्य रस्त्यावरती रेस्टॉरंट अशी यशस्वी वाटचाल केली. इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास हा सहज आणि सोपा नव्हता असं ते आवर्जून सांगतात. कारण भेळ विकणे हा छोटा व्यवसाय सुरू केल्यानंतर अनेकांनी नावे ठेवली. मात्र, या सगळ्या गोष्टी बाजूला सारून त्यांनी आपला व्यवसाय सुरूच ठेवला आणि आज यामध्ये यशस्वी झाले.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात