नागपूर, 24 नोव्हेंबर : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी अत्याधुनिक सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना अल्प सुविधा मिळाव्या, आणि विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावा या हेतूने नागपूर सुधार प्रन्यांसच्या पुढाकाराने अत्याधुनिक सुखसुविधांनी सुसज्ज अशा ई-लायब्ररीची उभारणी करण्यात आली आहे. हल्लीच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी यासाठी ही लायब्ररी मोठे वरदान ठरत आहे. लायब्ररी प्रामुख्याने समाजातील गरजू आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आलेली सर्व सुविधांनी सुसज्ज अशी लायब्ररी आहे. अल्प दरात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करता येणार आहे. या लायब्ररीचे वैशिष्ट्य असे की, शंभरहून अधिक अद्ययावत कम्प्युटर, वाय-फाय, हाय स्पीड इंटरनेट कनेक्शन, ज्येष्ठ नागरिकांसाठी वृत्तपत्र वाचनालय, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, आयटी प्लेसमेंट यासह रोजगार निर्मितीची अनेक पर्याय सुद्धा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येण्याचे प्रयत्न सुरू आहे. ही लायब्ररी पंडित दीनदयाळ उपाध्याय ई-लायब्ररी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व कौशल्य विकास परिषद केंद्र, नागपूर मानेवाडा, बालाजी नगर येथे आहे. कोणतंही प्रशिक्षण न घेता साकारल्या अविश्वसनीय कलाकृती, पाहताक्षणी पडेल भुरळ विद्यार्थ्यांचे भविष्य घडावे विद्यार्थ्यांना अभ्यास करता यावा यासाठी पूरक असलेले वातावरण, स्वतंत्र वाचनालय, क्लासरूम, डिजिटल रूम, अनेक विषयातील मार्गदर्शक तसेच अनेक विषयांवर आधारित सॉफ्टवेअर पुरवण्यात येत असतात. प्रामुख्याने या सर्व सुविधा अतिशय अल्प दरात उपलब्ध करून दिल्यामुळे ही लायब्ररी विद्यार्थ्यांसाठी मोठी पर्वणी असून यातून विद्यार्थ्यांचे भविष्य घडावे हाच आमचा मुख्य उद्देश आहे, अशी माहिती लायब्ररीचे संचालक योगेश कागदे यांनी दिली. चांगल्या सुविधा मिळत असल्यानं फायदा आमच्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी बाहेरच्या स्पर्धात्मक युगात व महागड्या सुविधांच्या तुलनेत ही लायब्ररी अतिशय अल्प दरात उपलब्ध झाल्याने आम्हाला सुविधा उपलब्ध झाली आहे. अभ्यासासाठी लागणारी शांतता आवश्यक ते पुस्तक डिजिटल रूम स्वातंत्र्य कंपार्टमेंट इथे असल्याने अभ्यास करताना पूरक असे वातावरण येथे मिळत असल्याचे लायब्ररीतील विद्यार्थी आस्था शिंदे यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.