अमरावती, 28 ऑगस्ट : अमरावतीमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याने दारुच्या नशेत एसटी बसमध्ये धिंगाणा घातला. तसेच बस वाहकालाही अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा प्रकार उघडकीस आला. अमरावती जिल्ह्यात एसटी बसमध्ये अमरावती-दर्यापूर मार्गावरील खोलापूरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. विठाई असे या बसचे नाव आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - अक्षय बेलसरे असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. तसेच दारूच्या नशेत धिंगाणा घालणाऱ्या या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या या पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा पोलीस कर्मचारी पोलीस मुख्यालयात नोकरीवर होता. दारुच्या नशेत त्याने चालकासोबत वाद घातला होता. यानंतर एसटी चालकाने थेट बस पोलीस ठाण्यात नेली. ही धक्कादायक गटना अमरावती-दर्यापूर मार्गावरील खोलापूर येथे घडली. बस सुरू असताना एक पोलीस कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत बडबड करत होता. यावेळी त्याने प्रवाशांसोबत वाद घातला. तसेच माझी चेकिंग कोणी करू शकत नसल्याचे म्हणत त्याने शिवीगाळ केली. तसेच चालकाला बस थांबवण्यास त्याने भाग पाडले. त्यानंतर दुसऱ्या एका कर्मचाऱ्याने त्याला शांत केले. मात्र, तरीसुद्धा त्याने दारुच्या नशेत वाहकाशीही वाद घातला. हेही वाचा - बायकोला संपवण्यासाठी नदीत धक्का देऊन ढकललं पण असा डाव फसला, नेमकं काय प्रकरण चालकाने थेट बस पोलीस ठाण्यात लावली. त्यानंतर ही बाब वरीष्ठांपर्यंत गेल्यानंतर या मद्यपी पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. पोलीस कर्मचाऱ्याच्या या घटनेनंतर बसमधील सर्वांनाच धक्का बसला होता. या घटनेचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.