जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / देवेंद्र फडणवीसांच्या भाजप आमदारांनाच कानपिचक्या, जाहीर कार्यक्रमात यादीच वाचून दाखवली

देवेंद्र फडणवीसांच्या भाजप आमदारांनाच कानपिचक्या, जाहीर कार्यक्रमात यादीच वाचून दाखवली

देवेंद्र फडणवीसांच्या भाजप आमदारांनाच कानपिचक्या, जाहीर कार्यक्रमात यादीच वाचून दाखवली

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर कार्यक्रमात भाजप आमदारांचे कान टोचले. भाषण करत असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या आमदारांना कानपिचक्या दिल्या.

  • -MIN READ Nagpur,Maharashtra
  • Last Updated :

नागपूर, 19 डिसेंबर : महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपूरमध्ये सुरूवात झाली आहे. याचवेळी नागपूरमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठकही पार पडली. या बैठकीनंतरच्या भाषणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदारांना कानपिचक्या दिल्या. सोशल मीडियाच्या वापरावरून फडणवीस यांनी भाजपच्या आमदारांना आरसा दाखवला. 21व्या शतकात तुम्ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह नाहीत, अनेक दिवस तुमचे सोशल मीडिया अकाऊंट अपडेट नसतात, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली. सोशल मीडियाचा वापर न करणाऱ्यांचे फडणवीस यांनी कान टोचले आहेत. ‘आमदारही 8-8 दिवस फेसबुकवर सक्रीय नसतात,’ असं म्हणत फडणवीस यांनी सोशल मीडियावर सक्रीय नसलेल्यांची यादीच वाचून दाखवली.

जाहिरात

‘9 जिल्हाध्यक्ष उत्तम आहेत, त्यांचं सोशल मीडिया चांगलं आहे. 5 जणांचं ठिकठाक आहे, पण 31 जणांनी चांगला वापर केला पण त्याची दखल नाही. 15 जण सक्रीयच नाहीत. काही आमदारांची फेसबुकवर 8-8 दिवस पोस्ट नाही. काहींचं तर ट्विटर अकाऊंटही ऍक्टिव्ह नाही. आपला सामान्य कार्यकर्ता नरेटिव्हची लढाई लढत आहे, पण पदाधिकारी नाही,’ अशा शब्दात फडणवीस यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सुनावलं आहे. तसंच आपण सगळ्यांनी चिंतन करायला हवं, असंही फडणवीस म्हणाले. भाजपचं मिशन दरम्यान आज दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपचं मिशन सांगितलं. विदर्भामध्ये पुढच्या वेळी 11 खासदार आणि 50 पेक्षा जास्त आमदार निवडून आणणार, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत. तसंच निवडून येणारे हे लोकप्रतिनिधी शिंदे आणि फडणवीस यांचे असतील, असंही बावनकुळे यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात