मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /लग्न ठरलेली तरुणी विवाहाच्या एकदिवस आधी गायब; 7 दिवसांनी आढळली धक्कादायक अवस्थेत

लग्न ठरलेली तरुणी विवाहाच्या एकदिवस आधी गायब; 7 दिवसांनी आढळली धक्कादायक अवस्थेत

अमरावती जिल्ह्यातील एका 19 वर्षीय तरुणीचे 6 जुलैला लग्न ठरलेले होते.

अमरावती जिल्ह्यातील एका 19 वर्षीय तरुणीचे 6 जुलैला लग्न ठरलेले होते.

अमरावती जिल्ह्यातील एका 19 वर्षीय तरुणीचे 6 जुलैला लग्न ठरलेले होते.

अमरावती, 13 जुलै : मी तुझ्यावर प्रेम वगैरे काही केलेले नाही. तर फक्त टाईमपास केला, असे एका प्रियकराने प्रेयसीला सांगितले आणि लग्नाला नकार दिला. यानंतर एका 19 वर्षाय प्रेयसीने गळफास घेत आत्महत्या केली. अमरावती जिल्ह्यामध्ये ही घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्न ठरलेल्या एका नियोजित वधूचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

काय आहे घटना -

अमरावती जिल्ह्यातील एका 19 वर्षीय तरुणीचे 6 जुलैला लग्न ठरलेले होते. मात्र, ही नियोजित वधू 5 जुलैच्या सायंकाळपासून बेपत्ता झाली होती. यानंतर मंगळवारी तिचा मृतदेह शेतातील विहिरीत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. तर माझ्या मुलीची हत्या झाली आहे, असा आरोप मृत तरुणीचे वडील संजय नेवारे यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी शिरजगाव कसबा पोलिसांकडे तक्रारही दाखल केली आहे.

संजय सदाशिव नेवारे हे शिरजगाव कसबामध्ये गोवारीपुरा भागांत राहतात. त्यांना एक मुलगी व मुलगा आहे. त्यांची मुलगी साक्षी (वय - 19) हिचे 6 जुलैला लग्न ठरले होते. 5 जुलैला सकाळी 4 ते 5 दरम्यान ती घराबाहेर गेली. तिचा मोबाइल घरीच होता. त्यामुळे ती कुठे बाहेर गेली असेल, असा कुटुंबीयांचा समज झाला. मात्र, त्यानंतर ती परत नाही आली. त्याच दिवसापासून ती दिसून न आल्यामुळे संजय नेवारे यांनी शिरजगाव पोलिसात तक्रार दाखल केली. नातेवाइकांनीही तिचा शोध घेतला.

हेही वाचा - 'माझं तुझ्यावर प्रेम नाहीये, मी टाईमपास केला'; प्रियकराचं बोलणं ऐकताच तरुणीने उचललं भयानक पाऊल 

मृतदेह आढळल्याने खळबळ -

दरम्यान, 12 जुलैला गोवारीपुराच्या मागील बाजूस असलेल्या नारायण पोटे यांच्या शेतातील विहिरीत तिचा मृतदेह आढळला. यानंतर एकच खळबळ उडाली. याप्रकरणी ठाणेदार प्रशांत गिते यांना माहिती दिली असता, पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह बाहेर काढला. तर यावेळी मुलीच्या अंगावर अर्धवट कपडे व जीभ बाहेर आली असल्याचे आढळले. याप्रकरणी पित्याच्या तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

First published:
top videos

    Tags: Amravati, Death, Girl death