मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /IND vs AUS : जावई आमचा भला! नागपूरकरांनी द्रविडचं ऐकलं, मॅचपूर्वी झाला मोठा बदल

IND vs AUS : जावई आमचा भला! नागपूरकरांनी द्रविडचं ऐकलं, मॅचपूर्वी झाला मोठा बदल

टीम इंडियाच्या हेड कोचची नागपूरमध्ये मोठी 'टेस्ट' आहे. (फोटो : AFP)

टीम इंडियाच्या हेड कोचची नागपूरमध्ये मोठी 'टेस्ट' आहे. (फोटो : AFP)

IND vs AUS : 19 वर्षांपूर्वी सौरव गांगुलीचा सल्ला धुडकावणाऱ्या नागपूरकरांनी यंदा जावई राहुल द्रविडचा सल्ला मानला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nagpur, India

    विशाल देवकर, प्रतिनिधी

    नागपूर, 9 फेब्रुवारी : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमधील पहिली टेस्ट सुरू होण्यासाठी आता काही तास उरले आहेत. नागपूरमधील जामठा स्टेडियमवर या सीरिजमधील पहिली टेस्ट होणार आहे. टीम इंडियाचा कोच आणि नागपूरचा जावई असलेल्या राहुल द्रविडच्या कारकिर्दीतील ही एक महत्त्वाची 'टेस्ट' आहे. आपल्या जावायाला मदत करण्यासाठी नागपूरकरांनी मॅचपूर्वी मोठा बदल केला आहे.

    काय झाला बदल?

    क्रिकेटमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल द्रविड जामठाच्या पिचवर समाधानी नव्हता. द्रविडला पिचची पाहणी करताना त्यावर गवत दिसले. ते गवत पाहून द्रविड नाराज झाला होता. त्यानं पिच क्युरेटरला ते गवत काढून नवं पिच तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर स्टेडिअमधील साईट स्क्रिनच्या जागेतही बदल करण्यात आले आहेत.

    दादा झाला होता नाराज

    राहुल द्रविडच्या नाराजीची दखल घेणाऱ्या नागपूरकर क्युरेटर्सनी 2004 साली टीम इंडियाचा तत्कालीन कॅप्टन सौरव गांगुलीचा सल्ला मात्र धुडकावला होता. 2004 साली भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातच नागपूरमध्ये टेस्ट मॅच होती. त्या टेस्टमधून सौरव गांगुलीनं ऐनवेळी खराब तब्येतीचं कारण देत माघार घेतली होती.

    IND vs AUS : नागपूरमधील 'त्या' घटनेमुळे रोहितला करावी लागली 3 वर्ष प्रतीक्षा! Photos

    गांगुलीनं तत्कालीन हेड कोच ग्रेग चॅपेलशी असलेल्या मतभेदातून माघार घेतल्याचं मानलं जात होतं. पण नागपूरच्या पिचचे माजी क्युरेटर किशोर प्रधान यांनी वेगळाच दावा केला आहे. प्रधान यांनी 'न्यू इंडियन एक्स्प्रेस' ला दिलेल्या मुलाखतीमध्ये गांगुलीनं पिच न आवडल्यानं माघार घेतल्याचा दावा केलाय.

    गांगुलीनं पिच पाहून त्यामध्ये बदल करण्याची सूचना केली होती. दोन्ही टीमचे सामर्थ्य आणि कमकुवत बाजू याचा विचार करून पिचमध्ये बदल हवा होता. मी ग्रीन पिच बनवले होते. या पिचमध्ये बदल होणार नाही, असं मी गांगुलीला सांगितलं. त्यानंतर त्यानं दुखापतीचं कारण देत माघार घेतली होती.' असं प्रधान यांनी सांगितलं.

    सौरव गांगुलीच्या अनुपस्थितीमध्ये राहुल द्रविडनं टीम इंडियाची त्या टेस्टमध्ये कॅप्टनसी केली. पण फास्ट बॉलिंगला मदत करणाऱ्या पिचवर ऑस्ट्रेलियानं टीम इंडियाचा 342 रननं पराभव केला. त्या मॅचमध्ये 35 पैकी 23 विकेट्स फास्ट बॉलर्सनी घेतल्या होत्या.

    नागपूरमध्ये टीम इंडियाचा दबदबा

    राहुल द्रविड हेड कोच झाल्यानंतर नागपूरमध्ये पहिल्यांदाच टेस्ट मॅच होत आहे. द्रविडला 19 वर्षांपूर्वीचा प्रसंग चांगलाच लक्षात आहे. त्यामुळे त्यानं सर्वात प्रथम पिच बदलण्याची सूचना केली. नागपूरकरांनीही यंदा जावायला मदत करण्याचं ठरवत त्याचा सल्ला मानला आहे.

    टेस्ट मॅच पाहण्यासाठी नागपूरला जाताय 'ही' ठिकाणं नक्की पाहा, Photos

    नागपूरच्या खेळपट्टीवर टीम इंडियाचा दबदबा राहिला आहे. इथं आजवर झालेल्या 6 टेस्टमध्ये टीम इंडियानं 4 टेस्ट जिंकल्या असून 1 पराभव स्विकारलाय. तर 1 टेस्ट ड्रॉ झाली आहे. ऑफ स्पिनर आर. अश्विनची नागपूरमध्ये नेहमीच चांगली कामगिरी झालीय. त्यानं या पिचवर खेळलेल्या 3 टेस्टमध्ये 23 विकेट्स घेतल्या आहेत.

    First published:

    Tags: Cricket, Local18, Nagpur, Rahul dravid, Sourav ganguly