Famous Tourist Places in Nagpur : टेस्ट मॅच पाहण्यासाठी नागपूरला जाताय 'ही' ठिकाणं नक्की पाहा, Photos
Nagpur Tourism : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील टेस्ट मॅच पाहण्यासाठी जगभरातील फॅन्स नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. या मॅचसोबतच शहरातील काही प्रेक्षणीय ठिकाणं नक्की पाहा.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील टेस्ट मॅच पाहण्यासाठी जगभरातील फॅन्स नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. नागपूरमध्ये ही मॅच पाहतानाच काही प्रेक्षणीय स्थळं पाहण्यास विसरू नका. (फोटो AP, AFP)
2/ 12
जगभरातील बौद्धधर्मीय आणि लक्षावधी आंबेडकर अनुयायांचे आदरांचे स्थान असलेल्या नागपूरतील दीक्षाभूमी हे एक पवित्र स्थान आहे. येथील भव्य स्तूप विशेष आकर्षणाचं केंद्र आहे.
3/ 12
फुटाळा तलाव : जगातील सर्वात उंच म्युझिकल फाउंटनमुळे या तलावाच्या वैभवात अधिक भर पडली आहे. हा म्युझिकल फाउंटन संगीताच्या तालावर नागपूर शहराचा इतिहास सांगतो. या संगीताला इंग्रजी आवाज दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन, हिंदी आवाज गीतकार-दिग्दर्शक गुलजार आणि मराठी आवाज नाना पाटेकर यांनी दिला आहे.
4/ 12
ताजबाग : हिंदू - मुस्लीम धर्मीयांच्या एकीचे प्रतीक असलेले संत ताजुद्दीन बाबांचे पवित्र श्रद्धास्थळ नागपुरातील ताजबाग भागात आहे. भारतासह देश विदेशातून लाखो भाविक भक्त आणि पर्यटक येथे येतात.
5/ 12
मध्यवर्ती संग्रहालय : महाराष्ट्रातील सर्वात जुने संग्रहालय म्हणून ओळख. विदर्भाच्या परिघात सापडलेल्या असंख्य पौराणिक आणि ऐतिहासिक वास्तूंचा अमूल्य ठेवा जवळून न्याहाळता येणारे हे मुख्य केंद्र.
6/ 12
टेकडी गणेश : नागपूरातील सीताबर्डीच्या टेकडीवर वसलेले प्राचीन गणेश टेकडी मंदिर म्हणजे तमाम नागपूरकरांचे आराध्य दैवत असून विदर्भातील अष्टविनायक पैकी एक प्रमुख स्थान आहे.
7/ 12
सीताबर्डी किल्ला : नागपूर शहराच्या मध्यवर्ती भागात एका टेकडीवर छोटेखानी मात्र भक्कम बांधणीचा किल्ला आहे. नागपूरकर भोसले आणि ब्रिटिशांमधील एका निर्णायक लढाईच्या स्मृती आजही या किल्ल्याने जपल्या आहेत.
8/ 12
अंबाझरी तलाव : पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र असलेल्या या तलावात असंख्य पशुपक्षी, पाणथळ परिसंस्था, जैवविविधता इत्यादींचे भंडार आहे. सोबतच इथे नव्याने उभारण्यात आलेले स्वामी विवेकानंद यांचा पुतळा, माहिती केंद्र हे मुख्य आकर्षणाचे केंद्र आहे.
9/ 12
कोरडी मंदीर : नागपूर पासून अवघ्या 15 किलोमीटरवर असलेले कोरडी येथील जगदंबा मातेचे प्रसिध्द मंदिर आहे.
10/ 12
महाराज बाग : नागपूरमधील या प्राणीसंग्रहालयात वेगवेगळे प्राणी आणि वनस्पती पाहाता येतात. लहान मुलांसाठी हे विशेष आकर्षणाचे केंद्र आहे.
11/ 12
झिरो माईल स्टोन : भौगलिकदृष्ट्या देशाच्या केंद्रस्थानी वसलेल्या नागपूर येथील शून्य मैलाचा दगड ( झीरो माईल स्टोन) स्मारकाला ऐतिहासिक आणि भौगोलिदृष्ट्या अतिशय महत्त्व प्राप्त असून ही नागपूर शहराची एक वेगळी ओळख आहे.
12/ 12
रमण विज्ञान केंद्र : क्षणिक अभ्यासक्रमाच्या दृष्टीने येथे असणारे वेगवेगळ्या विषयातील माहिती केंद्र, विज्ञानावर आधारित खेळणी इत्यादींसह हसत- खेळत विज्ञानातील प्रयोग पाहण्यासाठी ही लोकप्रिय जागा आहे.