चंद्रपूर, 29 मे, प्रशांत लिला रामदास : चंद्रपूरचे खासदार व काँग्रेस नेते बाळू धानोरकर यांना अस्वस्थ वाटत असल्यानं नागपुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती आणखी बिघडल्यानं त्यांना विशेष एअर ॲम्बुलन्सने दिल्लीला हलवण्यात आलं. त्यांच्यावर दिल्लीतील वेदांता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बाळू धानोरकर यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती समोर आली आहे. मल्टी ऑर्गन फेलीवर असल्यामुळे त्यांना सध्या कृत्रिम श्वासावर ठेवण्यात आलं आहे. वडिलांचं निधन विशेष म्हणजे शनिवारी सायंकाळी बाळू धानोरकर यांच्या वडिलांचं निधन झालं आहे. बाळू धानोरकर यांच्या वडिलांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी त्यांच्या मूळ गावी चंद्रपूर जिल्ह्यातल्या भद्रावती येथे अत्यसंस्कार करण्यात आले. शनिवारी सायंकाळपासूनच धानोरकर यांना अस्वस्थ वाटत होतं. त्यामुळे त्यांना उपचारासाठी नागपूरच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांची प्रकृती आणखी बिघडल्यानं त्यांना विशेष एअर ॲम्बुलन्सने दिल्लीला हलवण्यात आलं. त्यांच्यावर सध्या वेदांता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती समोर आली आहे. मल्टी ऑर्गन फेलीवरमुळे त्यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना कृत्रिम श्वासोच्छवासाचा पुरवठा करण्यात येत आहे. कार्यकर्त्यांशी संवाद दरम्यान दिल्लीला जाण्यापूर्वी बाळू धानोरकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ‘शनिवारी दिनांक 27 मे रोजी नागपूर येथील खासगी रुग्णालयात किडनी स्टोनवर उपचार केले. परतू आज पोटात दुखू लागल्याने तपासणीसाठी दिल्ली येथील वेदांता हॉस्पिटलला जात आहे. माझी प्रकृती स्थिर असून, कार्यकर्त्यांनी घाबरून जाऊ नये, किंवा भयभीत होऊ नये. वैद्यकीय सल्ल्यानुसार पुढील काही दिवस तपासणी, उपचार आणि विश्रांती घेत असल्याचं’ धानोरकर यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.