बुलडाणा, 14 डिसेंबर : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुषमा अंधारे यांनी हिंदू देवी देवता व साधुसंतांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यावरून आता महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ आक्रमक झाले आहे. माहाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाकडून सुषमा अंधारे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान कालच विश्व वारकरी संघटनेकडून सुषमा अंधारे या ज्या पक्षात असतील त्या पक्षाला मतदान करू नये, अशी शपथ घेण्यात आली होती. त्यानंतर अंधारे यांच्या विरोधात आज तक्रार दाखल करण्यात आली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
सुषमा अंधारे यांनी हिंदू देवी देवता व साधुसंतांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहेत. यावरून राज्यातील वारकरी समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. माहाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाकडून सुषमा अंधारे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओंमुळे भावना दुखावल्याचं वारकरी संघटनेनं तक्रारीमध्ये म्हटलं आहे.
हेही वाचा : अमित शाह महाराष्ट्राचे जावई, सीमावादाचे सर्वाधिक चटके त्यांच्या सासरवाडीला; संजय राऊतांचा टोला
विश्व वारकरी संघटनेकडून शपथ
सुषमा अंंधारे यांच्याविरोधात वारकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. मंगळवारी विश्व वारकरी संघटनेकडून सुषमा अंधारे ज्या पक्षात असतील त्या पक्षाला मतदान करणार नसल्याची शपथ घेण्यात आली आहे. तर आता माहाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाकडून सुषमा अंधारे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सुषमा अंधारे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्यानं अंधारे यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. वारकऱ्यांकडून अंंधारे यांना विरोध होत असल्याचं पहायला मिळत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.