नागपूर, 30 डिसेंबर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर झालेल्या सत्ताबदलानंतर हे पहिलेच हिवाळी अधिवेशन होते. या हिवाळी अधिवेशनचा आज शेवटचा दिवस आहे. हे संपूर्ण हिवाळी अधिवेशन आरोप-प्रत्यारोपांमुळे गाजलेलं पाहायला मिळालं. शेवटच्या दिवशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाने केलेल्या प्रत्येक आरोपाचा समाचार घेतला. काय म्हणाले मुख्यमंत्री? एक जानेवारीपासुन इंग्रजी नविन वर्ष सुरु होत आहे, त्यामुळे सर्वांना शुभेच्छा. दादा कालचे निर्णय झाले, त्याचे स्वागत करतील असं वाटलं होतं. पण तुम्ही आमच्या भाषणावर किती टाळ्या झाल्या हे मोजत होते. दादांना वाटल नव्हत की एवढे मोठे आम्ही निर्णय घेऊ. आमच्या सरकरच्या कामाचा हा वेग पाहिला आहे. 2 कोटी पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांनी एसटीतुन प्रवास केला. जपान, चीनमध्ये कोविड आला आहे, जर सरकार बदलले नसतं तर हे अधिवेशन इथे झाल नसतं. अडीच वर्षात तुम्ही विदर्भासाठी कोणता निर्णय घेतला? विदर्भातील शेतकरी चांगल्या गाडीतुन फिरला पाहजे. विमानातून शेतकरी फिरला पाहिजे. तालुक्यात विमानतळ सुरु करतोय. मुख्यमंत्री कसा हेलिकॉप्टरने शेतावर जातो म्हणुन हिणवलं. दुसरा मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने जाणारा दाखवा आणि बक्षिस मिळवा असं म्हटले. मी तर म्हणतो मागचे मुख्यमंत्री कधी घराबाहेर पडले हे दाखवा आणि बक्षिस मिळवा. मी पंतप्रधान यांच्याशी बोललो ते म्हणाले की असे उद्योग जात नसतात. त्यांना काय माहीत की सरकार बदलणार आहे. बाकीचे इंटरेस्ट ठेवलं तर कोण येणार इथे? 70 हजार कोटी रुपयांचे प्रकल्प मंजूर केले. त्यापैकी 40 हजार कोटींचे प्रकल्प विदर्भात आहेत. वाचा - …तेव्हा पटोले अजित पवारांसमोर नाक रगडत होते; बावनकुळेंनी पुन्हा ‘मविआ’ला डिवचलं सुरजागढ प्रकल्प पूर्ण होऊ शकला नसता मी पुढाकार घेतला. अडीच वर्षांत एका प्रकल्पाला मान्यता दिली आम्ही 18 प्रकल्पांना मान्यता दिली. दादा तुम्ही काल म्हणाले की मी चुकलो. चुका सुधारल्यानंतर माणूस सुधारतो. आम्ही वर्षावर गेल्यानंतर आम्हाला पाटीभर लिंब सापडली. रेशीम बागेत गेल्यानंतर अनेकांनी आम्हाला हिणवलं. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच काम करायचं म्हणुन आम्ही रेशीम बागेत गेलो, आम्ही गोविंदबागेत नाही गेलो.
रोज आरोप करतात. सर्व अंडे पिल्ले माहीत आहेत त्यांना. रस्त्यावर उतरुन काम करणाऱ्यांना तुम्ही अव्हान देता. कोविड असताना आम्ही रस्त्यावर उतरलो. लोकांना दिलासा दिला. त्यांना आम्ही जगवलं. आजही मी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत आहे. जयंत पाटील आज सभागृहात नाही ते पाहिजे होते. जयंत पाटील म्हणाले राष्ट्रवादीची शिवसेना झाली. मुख्यमंत्री यांच्या लालसेपायी ज्यांनी त्यांना तुरुंगात टाकण्याचा प्रयन्त केला, त्यांच्या मांडीला मांडी लावून कोण बसलं? बाळासाहेब यांचे विचार ज्यांनी विकले त्यांनी सांगायची गरज नाही. हिऱ्याच्या पोटी गारगोटी.. यापुढे मी काही बोलत नाही. महापुरुषांचा अपमान केला म्हणुन तुम्ही आमच्या वर टिका केली. मात्र, शिवाजी महाराज यांच्या वंशजाकडे पुरावे कोणी मागितले? महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे तैलचित्र तुम्ही लावू शकले नाही. मात्र, आम्ही ते लावले. बाळासाहेब ठाकरे यांचंही तैलचित्र लावण्याच काम आम्ही केलं. इथे हनुमान चालीसा बसला तर त्याला तुम्ही जेलमध्ये टाकलं. त्यांच्या पत्नी खासदार यांना ही जेलमध्ये टाकलं. गिरिष महाजन यांचा पुर्ण कार्यक्रम केला होता. ते बेलवरती आहेत. पण, जेलमध्ये कधीही जाऊ शकतात. आमच्या सकट चौकशा लावण्याचं पाप त्यावेळी केलं होतं. दादा तुम्ही आम्हाला सांगता की सत्तेची मस्ती नसावी मग त्यावेळी कोणती मस्ती होती.