जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Video : 7 इंचाची बाहुबली पाणीपुरी, एका घासात खाल्ली तर मिळते बक्षीस!

Video : 7 इंचाची बाहुबली पाणीपुरी, एका घासात खाल्ली तर मिळते बक्षीस!

Video : 7 इंचाची बाहुबली पाणीपुरी, एका घासात खाल्ली तर मिळते बक्षीस!

चिराग का चस्का पाणीपुरी सेंटरमधील तब्बल 7 इंच आकार असलेली बाहुबली पाणीपुरी जरा हटके आहे.

  • -MIN READ Nagpur,Nagpur,Maharashtra
  • Last Updated :

    नागपूर, 11 नोव्हेंबर : पाणीपुरी हे नुसते नाव जरी उच्चारलं तरी तोंडाला पाणी सुटतं. पाणीपुरी आवडत नाही असा खवय्या मिळणं तसं दुर्मीळच. पाणीपुरी, गुपचूप, गोलगप्पे अशा विविध नावाने ओळखला जाणारे पाणीपुरीचे अनेक प्रकार आहेत.  त्यात अनेक प्रयोग देखील झालेले आहेत. मात्र, नागपुरातील  चिराग का चस्का पाणीपुरी सेंटरमधील तब्बल 7  इंच आकार असलेली बाहुबली पाणीपुरी जरा हटके आहे. चिराग का चस्का हे पाणीपुरी प्रेमींसाठी आवडते डेस्टिनेशन आहे.   चिराग का चस्का या चाट सेंटरची खासियत म्हणजे मोठा आकाराची पाणीपुरी आणि 7 प्रकारचे फ्लेवर पाणी. त्यात प्रामुख्याने नागपूरचे फेमस सावजी पाणी, मँगो, गारलिक, दहिभल्ला, जिरा, रेग्युलर पाण्याचा समावेश आहे. चिराग पवार यांच्या चाट सेंटरचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बाहुबली गुपचूप. 7 इंच एवढ्या मोठ्या आकाराची पाणीपुरी, त्यात सर्व प्रकारचे फ्लेवर पाणी, आलुची चटणी, त्यावर दही, शेव, बुंदी, चाट मसाला कोथिंबीर अशा साहित्याने ही बाहुबली पाणीपुरी तयार होते. ही पाणीपुरी एका घासात खाने म्हणजे आव्हानच आहे. एका घासात ही पाणीपुरी खाणाऱ्याला विशेष पारितोषिक देण्यात येते. 30 वर्षांपासून कुणीच नाही जवळपास, ‘हा’ समोसा आहे सर्वात खास! Video हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेऊन व्यवसाय  हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतलेल्या चिराग पवार यांना आधीपासूनच लज्जतदार आणि तितकीच भन्नाट डिश तयार करायची आवड होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे आपण व्हावे, अशी मनीषा बाळगून चिराग यांनी 2 वर्षापूर्वी एक चिराग का चस्का नावाने चाट सेंटर काढले. 7 प्रकारच्या फ्लेवरमधील पाणीपुरी आणि नावीन्यपूर्ण 7 इंच एवढी बाहुबली पाणीपुरीमुळे बघता बघता चिरागरचे हे सेंटर प्रसिद्धीस आले. 2 वर्षात चाट सेंटरची सर्वत्र ख्याती  चिराग का चस्का चाट सेंटरमध्ये आज  एकूण 17 लोक काम करत आहेत. चिरागसह आज त्यांना देखील रोजगार उपलब्ध झाला आहे. 2 वर्षात चाट सेंटरची ख्याती सर्वत्र पसरली असून ग्राहकांची रीघ या ठिकाणी लागलेली असते. चिराग का चस्कामध्ये पाणीपुरी व्यतिरिक्त शेवपुरी, दहिपुरी चाट मसाला, सँडविच आणि विशेष म्हणजे सात फूट लांबीचा भव्य डोसा सुद्धा मिळतो. चिराग का चस्का चाट सेंटर हे दुपारी 12 ते रात्री 10 पर्यंत सुरू असतं. येथे भेट देण्यासाठी प्रताप नगर गाठून तेथील राधमंगल कार्यालयच्या सामोरंच हे चाट सेंटर आहे.  

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: food , Local18 , nagpur
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात