मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शेजाऱ्यावर विळ्याने हल्ला करुन स्वतःही उचललं टोकाचं पाऊल, यवतमाळमधील धक्कादायक घटना

शेजाऱ्यावर विळ्याने हल्ला करुन स्वतःही उचललं टोकाचं पाऊल, यवतमाळमधील धक्कादायक घटना

यवतमाळ शहरातील राजीव नगरमध्ये एका शेजाऱ्याने दुसऱ्या शेजाऱ्यावर विळ्याने हल्ला केला.

यवतमाळ शहरातील राजीव नगरमध्ये एका शेजाऱ्याने दुसऱ्या शेजाऱ्यावर विळ्याने हल्ला केला.

यवतमाळ शहरातील राजीव नगरमध्ये एका शेजाऱ्याने दुसऱ्या शेजाऱ्यावर विळ्याने हल्ला केला.

    यवतमाळ, 12 जुलै : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. (Crime News in Maharashtra) आत्महत्या, हत्या (Murder, Suicide in Maharashtra) यासांरख्या घटना सातत्याने पाहायला मिळत आहेत. यवतमाळ (Yawatmal) जिल्ह्यातून आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका व्यक्तीने दुसऱ्यावर हल्ला केल्यानंतर स्वत: विष पिऊन आत्महत्येचा (Man suicide attempt on attack on neighbor) प्रयत्न केला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - यवतमाळ शहरातील राजीव नगरमध्ये एका शेजाऱ्याने दुसऱ्या शेजाऱ्यावर विळ्याने हल्ला केला. यानंतर त्याने स्वत: विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. गजानन व्यवहारे असे 50 वर्षीय विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्याचे नाव आहे. तर रामेश्वर डेहणकर असे 48 वर्षीय हल्ला झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवारी सकाळी 10च्या सुमारास घडली. गजानन व्यवहारे याने सोमवारी सकाळच्या सुमारास शेजारी राहणारे रामेश्वर डेहणकर यांच्यावर कोणताही वाद नसताना अचानक हल्ला केला. यात डेहणकर यांच्या छातीला गंभीर दुखापत झाली. हल्ला करुन गजानन व्यवहारेने तेथून पळ काढला. यानंतर तो गावाबाहेर गेला. तसेच स्वत: विषाचा डबा सोबत घेऊन तो गावाबाहेर गेला होता. यावेळी त्याने गावाबाहेर जाऊन विष घेऊन आत्महत्या केली. हेही वाचा -  बुलढाण्यातली लेडी किलर; एका प्रियकराच्या मदतीने दुसऱ्या प्रियकराच्या वडिलांची हत्या घटनेची माहिती मिळताच, स्थानकांनी गंभीर जखमी रामेश्वर डेहणकर आणि आत्महत्येचा प्रयत्न केलेला गजाननला लगेचच शासकीय रुग्णालयात दाखल केले. या दोघांवरही तेथे उपचार सुरू आहेत. दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Yawatmal

    पुढील बातम्या