जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Nagpuri Cooler : नागपूरच्या कुलरची सर्वत्रच चर्चा, 6 फुटांच्या कुलर समोर एसी ही फेल

Nagpuri Cooler : नागपूरच्या कुलरची सर्वत्रच चर्चा, 6 फुटांच्या कुलर समोर एसी ही फेल

नागपूरच्या कुलरची सर्वत्रच चर्चा, 6 फुटांच्या कुलर समोर एसी ही फेल

नागपूरच्या कुलरची सर्वत्रच चर्चा, 6 फुटांच्या कुलर समोर एसी ही फेल

नेकजण थंड हवेसाठी कुलर पेक्षा एसी लावण्याला जास्त प्राधान्य देतात. याच कारण म्हणजे एसी ही कुलर पेक्षा थंड हवा देते. मात्र सध्या सर्वत्र चर्चेत असणारा नागपूरचा कुलर हा एसी पेक्षा ही प्रभावी ठरत आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

सध्या उष्णतेचा तडाखा वाढत असल्याने अनेकजण घरात थंड हवा मिळण्यासाठी एसी कुलर बसवून घेतात. यातही अनेकजण थंड हवेसाठी कुलर पेक्षा एसी लावण्याला जास्त प्राधान्य देतात. याच कारण म्हणजे एसी ही कुलर पेक्षा थंड हवा देते. मात्र सध्या सर्वत्र चर्चेत असणारा नागपूरचा कुलर हा एसी पेक्षा ही प्रभावी ठरत आहे. नागपुरी कुलरचे नाव ऐकून लोकांना वाटते की हे कुलर नागपुरात मिळतील, पण तसे नाही. नागपुरी कूलर हे कुलरचे मॉडेल आहे. या कूलरची सुरुवात नागपुरातून झाली होती. त्याच्या उत्कृष्ट गुणवत्तेमुळे, हे कुलर आता मोठ्या प्रमाणावर पसंत केले जात आहेत आणि जवळजवळ संपूर्ण देशात उपलब्ध आहेत. या कूलरमुळे खोली इतकी थंड होते की अंगावर ब्लँकेट घ्यावे लागते. सामान्य कूलर इतके कूलिंग करू शकत नाहीत. चला जाणून घेऊया हा कूलर इतका खास का आहे. नागपुरी कुलरची बॉडी ही 6 फूट असून या कुलरमध्ये एक्झॉस्ट फॅन बसवण्यात आला आहे. त्यामुळे हा पंखा जोराचा वारा देतो. यासोबतच नागपुरी कुलरमध्ये  पॅड आणि हवेच्या प्रवाहासाठी मोठी जागा देण्यात आली आहे. या कारणास्तव हे कुलर सामान्य कूलरपेक्षा चांगले काम करतात. ते कमी वीज वापरत असल्याने, ज्यांना एअर कंडिशनर परवडत नाही अशांसाठी नागपुरी कुलर हा उत्तम पर्याय आहे. Storing Chicken : चिकन फ्रिजमध्ये किती दिवस ठेवणं सुरक्षित, खराब झाल्यावर काय दिसतात बदल? नागपुरी कुलरला तुम्ही इंस्टॉल करू शकता. यात जर तुम्हाला लाकडाची बॉडी हवी असेल आणि प्लॅस्टिकचा टॅंक हवा असेल तर तुम्ही असे  सहज करू शकता. तसेच कुलरमध्ये लागणार फॅन देखील तुम्ही बाजारातून तुमच्या आवडी प्रमाणे आणू शकता. अशा स्थितीत तुम्हाला 10 ते 15 हजार रुपयांमध्ये नागपुरी कूलर सहज मिळू शकेल. मात्र, पंखा घेताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, त्याच्या मोटरला कॉपर वायरिंग असावी. नागपुरी कुलरची देखभाल : जर तुम्ही लाकडी बॉडीमध्ये नागपुरी कुलर विकत घेत असाल तर त्याची टाकी ही प्लॅस्टिकची घ्या. यामुळे तुम्हाला दरवर्षी तो रंगवण्याची गरज भासणार नाही. यासोबतच या कुलरची मोटारही लवकर खराब होत नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात