चिकन किंवा मटण हे प्रथिनांचे भांडार आहेत. संपूर्ण जगात, लोक त्यांच्या आहारात प्रथिनांसाठी चिकनचा सर्वाधिक समावेश करतात. जरी निरोगी आणि चवदार चिकन हे लाखो बॅक्टेरियांची संक्रमित असते. तेव्हा चिकन कसे स्टोर करावे, कसे शिजवावे आणि शिजवल्यानंतर कशा प्रकारे स्टोर करावे हे अधिक महत्वपूर्ण आहे. चिकनची साठवणूक योग्य प्रकारे न झाल्यास अनेक आजारांचा धोका असतो. बहुतेक लोक बाजारातून कच्चे चिकन आणून फ्रीजमध्ये ठेवतात. अशा परिस्थितीत चिकन किती दिवस फ्रिजमध्ये ठेवल्याने कोणतेही नुकसान होत नाही, आणि केव्हा खराब होऊ लागते हे जाणून घेणे आवश्यक आहे. युनायटेड स्टेट्सच्या कृषी विभागाच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे की, कच्चे चिकन रेफ्रिजरेटरमध्ये 1 किंवा 2 दिवसांपेक्षा जास्त काळ ठेवू नये. चिकन फ्रिजमध्ये जास्त काळ का ठेऊ नये : काही रिपोर्टनुसार, कच्चे चिकन 2 दिवसांपेक्षा जास्त काळ फ्रीजमध्ये ठेवू नये, तर शिजवलेले चिकन 3 ते 4 दिवसांपेक्षा जास्त काळ फ्रीजमध्ये ठेवू नये. फ्रीजमध्ये चिकन ठेवल्याने बॅक्टेरियाची वाढ मंदावते. फ्रीजचे तापमान ४ अंशांपेक्षा कमी राहिल्यास चिकनमध्ये बॅक्टेरियाचा विकास फारच कमी होतो. तसेच कच्चे चिकन फ्रिजमध्ये ठेवायचे असल्यास ते लीक-प्रूफ कंटेनरमध्येच ठेवावे. यामुळे चिकनमधील द्रव पदार्थाची गळती होत नाही आणि इतर अन्नपदार्थ दूषित होत नाहीत. शिजवलेले चिकन देखील हवाबंद डब्यात रेफ्रिजरेट केले पाहिजे. जर तुम्हाला कच्चे चिकन जास्त काळ साठवायचे असेल तर ते फ्रीजमध्ये ठेवा. यामुळे जीवाणूंचा संसर्ग होण्याचा धोका कमी होईल. मटणाच्या बाबतीतही हाच नियम आहे.
खराब झालेले चिकन खाल्ल्याने होणारे आजार : जर चिकन जास्त तापमानात रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले तर यात बॅक्टेरियाचा विकास वाढतो. यामुळे हे अन्न खाल्ल्याने अनेक आजारांचा धोका वाढतो. खराब झालेल्या चिकनमध्ये विष तयार होते, जे शिजवल्यानंतरही निघत नाही. यामुळे थंडी वाजून येणे, मळमळ, उलट्या, अतिसार, रक्तरंजित मल आणि निर्जलीकरण होऊ शकते. अशावेळी तुम्हाला रुग्णालयात उपचार करण्याची वेळ येऊ शकते, आणि गंभीर स्थिती असल्यास तुमचा मृत्यू देखील होऊ शकतो. एक कप कोथिंबीरचा चहा आणि…, उष्माघातामुळे होणाऱ्या लूज मोशन पासून मिळेल आराम फ्रीजमधील चिकन खराब झाले आहे हे कसे समजावे? फ्रिजमध्ये चिकन जास्त वेळ ठेवल्यास चिकन खराब होईल. ते कसे ओळखायचे हे जाणून घेणे महत्वाचे आहे. 1. रंग बदलणे - फ्रीजमध्ये ठेवलेले चिकन तांबड्या आणि हिरवे झाले तर समजून घ्या की चिकन खराब झाले आहे. यावेळी हे चिकन भरपूर जिवाणूंनी दूषित झालेले असते. 2. दुर्गंधी- फ्रिजमध्ये ठेवलेल्या चिकनला दुर्गंधी येऊ लागली तर समजा चिकन कुजले आहे. ते कोणत्याही परिस्थितीत खाऊ नये. चिकन शिजल्यानंतर फ्रिजमध्ये ठेवले तरी त्याला अमोनियासारखा वास येत असेल तर ते खराब झाले आहे. 3. रेक्श्चर - खराब झालेल्या चिकनचे रेक्श्चरही बदलते. अशा स्थितीत चिकन धुवून देखील यातील बॅक्टेरिया निघत नाहीत. तसेच ज्या भांड्यात तुम्ही चिकन धुवत आहात तेही दूषित होईल.