नेहाल भुरे, भंडारा बीड, 16 फेब्रुवारी : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. आर्थिक फसवणुक तसेच चोरीच्याही घटना घडत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. स्वस्तात दुचाकी देण्याचे आमिष देत तब्बल 20 लाख रुपयांचा गंडा घालण्याचा प्रकार भंडारा येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी तिघांवर भंडारा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एकाला अटक करण्यात आली आहे. कासिफ जहीर खान, राजेंद्र राहांगडाले (25), हेमंत वंजारी (47, तिघे रा. भंडारा) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींनी rie दुचाकी वाहनाचा शोरूमचा फायनान्सर असल्याचा बनाव करून ग्राहकांना त्यांनी जाळ्यात ओढले. ऑनरोड किमतीपेक्षा 10 ते 15 हजार रुपये कमी किमतीत दुचाकी देण्याचे आमिष दिले. तसेच सहा महिन्यांच्या हप्त्यावर दुचाकी देत असल्याचे सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवत फसवणूक झालेल्यांनी दुचाकीच्या किमतीच्या 70 टक्के रक्कम एआयएम फायनान्स सोल्युशन सर्व्हिसेसकडे जमा केली. त्यांनी दुचाकीच्या शोरूममध्ये डाऊन पेमेंट करून दुचाकी ग्राहकांना दिली. सुरुवातीचे सहा हप्ते भरण्यात आले. मात्र, नंतरचे हप्ते ठरल्याप्रमाणे फायनान्स कंपनीकडे भरले नाही. त्यामुळे संबंधित फायनान्स कंपनीने या गाड्या जप्तीची कारवाई सुरू केली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. हेही वाचा - Beed News : लग्नामध्ये गर्दीचा फायदा घेऊन चोरी, टोळी CCTV कॅमेऱ्यात कैद, एका मुलीचाही समावेश तब्बल 20 लाख 48 हजार रुपयांची फसवणूक केल्याची विजय सोविंदा कुथे (53, रा. पिंपळगाव, ता. लाखनी) यांनी भंडारा ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी कासिफ खान, राजेंद्र राहांगडाले आणि हेमंत वंजारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भंडारा ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला असता कासिफ जहीर खान याला पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. यानंतर त्याला भंडारा न्यायालयापुढे हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तर इतर फरार आरोपींचा शोध भंडारा पोलीस घेत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.