गडचिरोली, 31 ऑगस्ट : दरवर्षी वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी दरवर्षी लाखो उमेदवार नीट (NEET) परीक्षेला बसतात. नीट ही परीक्षा खूप कठीण असते. भंडारा जिल्ह्यात नीट परिक्षेतील अपयशाच्या भीतीने एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. हर्षद सदु तलांडे असे 18 वर्षीय मृताचे नाव आहे. विष घेत त्याने आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण -
एटापल्ली जवळील पद्देवाही (टोला) येथील हर्षद सदु तलांडे या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. हर्षद याच्या आई रुनिता तलांडे या गुरुपल्लीच्या माजी सरपंच तसेच विद्यमान सदस्य आणि वडील संदु तलांडे हे बिड्री जिल्हा परीषद शाळेत शिक्षक आहे. हर्षदने यापूर्वी नागपूरला जाऊन नीट परीक्षा दिली होती. मात्र, त्याला या परीक्षेत कमी गुण मिळाले होते.
तसेच मागील महिन्यात त्याने पुन्हा नीटची परीक्षा दिली. परीक्षा दिल्यानंतर 19 ऑगस्टला तो घरी परत आला होता.
अजून या परीक्षेचा निकाल लागायचा आहे. मात्र, हर्षद हा घरी आल्यानंतर नीट परीक्षेत अपेक्षित यश मिळेल की नाही या तणावात राहत होता. या तणावातूनच तो मंगळवारी सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घरी विष प्यायला. यानंतर त्याला ग्रामीण रुग्णालय एटापल्ली येथे दाखल करण्यात आले.
हेही वाचा - 'लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीचा धसका, वनक्षेत्र सहाय्यकाने घेतला धक्कादायक निर्णय
तेथून पुढे अहेरी येथे रेफर करण्यात आले. यानंतर अहेरीवरुन चंद्रपूरला एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, बुधवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. हर्षदला एक बहिण असून तो एकुलता एक मुलगा होता. त्याने घेतलेल्या या टोकाच्या निर्णयानंतर हळहळ व्यक्त केली जात आहे.
नीट परीक्षा काय?
दरवर्षी देशात अनेक प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. NTA द्वारे घेतलेल्या प्रवेश परीक्षेद्वारे, विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रम, अभियांत्रिकी अभ्यासक्रम इत्यादी अभ्यासक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते. वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी दरवर्षी लाखो उमेदवार NEET परीक्षेला बसतात. NEET परीक्षा खूप कठीण असते. वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी या परीक्षेसाठी अनेक उमेदवारांना अनेक प्रयत्न करावे लागतात. NTA (National Testing Agency) NEET UG परीक्षा आणि NEET PG परीक्षा दोन्ही आयोजित करते.ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट मेडिकलच्या कोर्सेसला प्रवेश मिळतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Death, Gadchiroli, Student