मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नागपूरकरांनो सावधान! कोरोनासोबत वाढतोय स्वाईन फ्लूचा धोका

नागपूरकरांनो सावधान! कोरोनासोबत वाढतोय स्वाईन फ्लूचा धोका

आरोग्य विभागाकडून डेथ ऑडिट रिपोर्ट प्रकाशित करण्यात आलं.यामध्ये ही माहिती पुढे आली. त्यामुळे नागपूर जिल्ह्यात मागच्या दोन महिन्यात स्वाईन फ्लूमुळे झालेल्या मृत्यूचा आकडा हा 10 वर पोहोचला आहे.

  • Published by:  Kranti Kanetkar
प्रतिनिधी, तुषार कोहळे, नागपूर, 19 ऑगस्ट : नागपुरात कोरोना पाठोपाठ आता स्वाईन फ्लू देखील डोकं वर काढत आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आणि सतर्क राहण्याचं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे. पंधरा दिवसात नागपूरमध्ये स्वाईन फ्लूमुळे पाच रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाकडून डेथ ऑडिट रिपोर्ट प्रकाशित करण्यात आलं.यामध्ये ही माहिती पुढे आली. त्यामुळे नागपूर जिल्ह्यात मागच्या दोन महिन्यात स्वाईन फ्लूमुळे झालेल्या मृत्यूचा आकडा हा 10 वर पोहोचला आहे. आता एकूण संख्या ही 211 झाली आहे. काय आहेत स्वाईन फ्लूची लक्षणं स्वाईन फ्लू झालेल्या व्यक्तींना थंडी, ताप, सर्दी, खोकला, घसादुखी, अंगदुखी, पोटदुखी, मळमळ, उलटी, जुलाब आणि कधी कधी पोटदुखी इत्यादी लक्षणं दिसतात. त्यामुळे यापैकी कोणतंही लक्षण तुम्हाला असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घ्या. कोरोना होऊन गेलेल्यांना मानसिक आजारासह या गंभीर समस्यांचा धोका; चिंता वाढवणारी माहिती समोर स्वाईन फ्लू झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यानं हा आजार पसरण्याची शक्यता आहे. खोकला, शिंका, व्यक्तीच्या स्पर्शातून हा आजार पसरू शकतो. नाक, डोळे आणि कानावाटे याचा संसर्ग होण्याचा धोका जास्त आहे. डायबेटिस आणि हार्ट पेशंट असलेल्या लोकांनी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. कोरोनासोबत पुन्हा एकदा स्वाईन फ्लू डोकं वर काढत आहे. आधीच व्हायरल ताप आणि साथीच्या आजारांमुळे टेन्शन वाढत असताना नागपुरात स्वाईन फ्लूचं थैमान पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.
First published:

Tags: Coronavirus, Nagpur, Swine flu in india

पुढील बातम्या