अजित मांढरे, प्रतिनिधी रायगड, 11जून : सध्या देशभरात ऑनलाईन धर्मांतरचा विषय गाजत आहे. या धर्मांतराच्या विषयाचे कनेक्शन मुंब्र्यात असल्याची बाब उघड झाली आहे. मुंब्र्यातील आरोपी शाहनवाज खान याने फेक युजर आयडी बनवून त्याच्या मदतीने एक गेम लॉन्च केला. या गेममध्ये हिंदू मुलांना कलमा वाचण्यासाठी तयार करून इस्लाम कबूल करण्यास भाग पडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे. मोबाईलवरून धर्मांतर प्रकरणी आरोपी ठाणे पोलिसांनी रायगड जिल्ह्यातून अटक केली आहे. शाहनवाज मकसूद असे आरोपीचे नाव आहे. धर्मांतराचे पाकिस्तान कनेक्शन मोबाईल गेमद्वारे धर्मांतर प्रकरणाचे कनेक्शन पाकिस्तानशी जुळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ठाणे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी शाहनवाज मकसूदकडून धक्कादायक खुलासा. आरोपीच्या चौकशीत मोठी माहिती समोर आली आहे. फरार झाकीर नाईक यांच्या भाषणाला प्रेरित होवून धर्मांतराचे कृत्य केल्याची माहिती. मुळचा मुंबईचा झाकीर नाईक भाषणाद्वारे धर्मांतर आणि प्रतिबंधित देशातून फंड घेतल्याप्रकरणी फरार आहे. झाकीर नाईक आखाती देशात तसेच पाकिस्तानात असल्याची माहिती मधल्या काळात एजन्सीने दिली होती. अटक आरोपी मकसूदने गाझीयाबाद येथील मुलाचे धर्मांतर झाकीर नाईक यांच्या भाषणाआधारे केल्याची कबूली दिली आहे. आरोपी मकसूदकडून 1 मोबाईल फोन, 1 टॅब जप्त करण्यात आला आहे. शाहनवाज मकसूद हा काही प्रतिबंधित आरोपींशी संपर्कात असल्याचा ठाणे पोलिसांना संशय आहे. गाझीयाबाद पोलीस आरोपी शाहनवाज मकसूद याला शोधत होती. रायगड जिल्ह्यातील अलिबाग मधून त्याला अटक करण्यात आली आहे. एका लॅाजमध्ये नाव बदलून राहत होता. ठाणे पोलिसांनी शाहनवाज मकसूदला त्याच्या भावासह अटक केली आहे. वाचा - Ajit Pawar On Supriya Sule : सुप्रिया सुळे यांच्या निवडीमुळे नाराज? अजितदादांनी स्वतःच दिलं उत्तर, म्हणाले.. काय आहे प्रकरण? मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश एसटीएफचे पथक आरोपीच्या शोधासाठी मुंब्र्यात दाखल झाले. या प्रकरणाच्या तपासात उत्तर प्रदेश पोलिसांनी गाजियाबाद येथून अब्दुल रहमान उर्फ नन्नी पुत्र महमूद अन्सारी या आरोपीला अटक केली. कुटुंबीयांची तक्रार गाझियाबाद येथून अटक करण्यात आलेल्या आरोपीने पोलिसांच्या चौकशीत सांगितले की, महाराष्ट्रातील मुंबईला लागून असलेल्या मुंब्रा भागात शाहनवाज मकसूद खान हा बनावट युजर आयडी बनवून त्याच्या माध्यमातूनतो तो गेम खेळण्यासाठी उपलब्ध करून देत होता. या गेममध्ये हरलेल्या हिंदू मुलांना तो कलमा वाचायला सांगून इस्लाम कबूल करण्यास भाग पडत होता. त्यांना कलमा वाचल्यानंतर तुम्ही कधीही गेम हरणार नसल्याचे प्रलोभन दाखवत होता. शाहनवाजच्या शेजारच्यांनी सांगितले की, त्याच्या घरात तीन भाऊ आणि आई असा परिवार आहे. शाहनवाजचा हर्बल शॅम्पू बनवण्याचा व्यवसाय आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.