मुंबई, 3 जून : कोरोना व्हायरसशी सामना करणाऱ्या महाराष्ट्रावर आणखी एक संकट उभे ठाकले आहे. निसर्ग चक्रीवादळ अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकले आहे. पुढील काही तासात हे वादळ मुंबईसह राज्यातील इतर जिल्ह्यातून जाणार असल्याची माहिती सांगितली जात होती. मात्र मुंबईकरांसाठी आता दिलासादायक बाब आहे.
चक्रीवादळाची दिशा आता पनवेल, कर्जत, खोपोली, नाशिक या मार्गाने जाणार असल्याची माहिती डॉ. अनुपम कश्यपी, प्रमुख हवामान संशोधक, पुणे वेधशाळा यांनी वर्तवली आहे. आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास निसर्ग चक्रीवादळ अलिबाग आणि श्रीवर्धन जवळ किनारपट्टीला धडकले आहे. वादळ धडकल्यानंतर ताशी 100 ते 120 किलोमीटर चक्रीकार वारे वाहून पाऊस पडत आहे.
चक्रीवादळ अलिबागच्या किनाऱ्यावर पोहचल्यानंतर याचे पडसाद पुण्यातही उमटतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
:- पुण्यात वाऱ्याचा वेग ताशी 60 ते 70 किमी असेल..
:- पुणे जिल्हयातील घाटमाथा परिसरात मुसळधार पाऊस पडून पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता..
:- आज (मंगळवारी) रात्री उशिरापर्यंत पाऊस पडण्याची शक्यता
:- जुनी घरं, झाडे, विजेचे पोल यांचे वाऱ्याच्या वेगामुळे मोठं नुकसान होऊ शकतं...
:- पुणे जिल्ह्यात देखील लोकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे...
हे वाचा-'निसर्ग'च्या पहिल्याच तडाख्याने मलबार हिलच्या इमारतीचं छप्पर गेलं उडून
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.