मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

विनायक मेटे यांच्या अपघातापूर्वीचा खालापूर टोलनाक्यावरचा Video समोर, अनेक गोष्टींचा होणार उलगडा

विनायक मेटे यांच्या अपघातापूर्वीचा खालापूर टोलनाक्यावरचा Video समोर, अनेक गोष्टींचा होणार उलगडा

या अपघातात चालक सुखरूप आहे. तर डाव्या बाजूला पुढे अंगरक्षक पोलीस तर मागे विनायक मेटे बसले होते. दरम्यान, या अपघातापूर्वीचा खालापूर टोलनाका येथील Video समोर आला आहे.

या अपघातात चालक सुखरूप आहे. तर डाव्या बाजूला पुढे अंगरक्षक पोलीस तर मागे विनायक मेटे बसले होते. दरम्यान, या अपघातापूर्वीचा खालापूर टोलनाका येथील Video समोर आला आहे.

या अपघातात चालक सुखरूप आहे. तर डाव्या बाजूला पुढे अंगरक्षक पोलीस तर मागे विनायक मेटे बसले होते. दरम्यान, या अपघातापूर्वीचा खालापूर टोलनाका येथील Video समोर आला आहे.

  • Published by:  Rahul Punde
मुंबई, 14 ऑगस्ट : शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे (vinayak mete) यांचं आज अपघाती निधन झालं. मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर (mumbai pune expressway) विनायक मेटे यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. आता या अपघातापूर्वीचा व्हिडीओ समोर आला आहे. विनायक मेटे यांच्या अपघातापूर्वीचा खालापूर टोलनाका येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला हा व्हिडीओ आहे. या अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे, त्याचा शोध घेतला जात असल्याची माहिती रायगड पोलिसांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मराठा आरक्षणासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी विनायक मेटे हे रात्रीच रवाना झाले होते. आज बीडमध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले होते. सर्व कार्यक्रम रद्द करून विनायक मेटे हे मुंबईला रवाना झाले होते. मुंबईला जात असताना विनायक मेटे यांच्या गाडीला मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात झाला. गाडीमध्ये त्यावेळी तीन व्यक्ती होते. जखमी व्यक्तींना तातडीने पनवेलमधील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास केला जात आहे. तपासातून सर्वबाबी समोर येईल. एक मोठा ट्रक होता, या ट्रकला पाठीमागून कार धडकली आहे, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक दुधे यांनी दिली. अपघातापूर्वीचा व्हिडीओ समोर शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघातापूर्वी खालापूर टोलनाका येथून जात असताना तिथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मेटे यांची गाडी दिसत आहे. यामध्ये पुढे दोन लोक बसलेले गाडीत दिसत आहेत. या व्हिडीओचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.  तसंच, सध्या या प्रकरणी गुन्हा दाखल केला जात आहे. त्यानंतर तपास केला जाणार आहे. तो ट्रक घटनास्थळावरून निघून गेला आहे. त्याचा शोध घेतला जात आहे. एकूण 8 टीम तपास करत आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे, अशी माहितीही दुधे यांनी दिली. Vinayak Mete :...तर मेटे वाचले असते, बैठकीचा वेळ का बदलला? मराठा मोर्चा कार्यकर्त्यांचा आरोप या अपघातात चालक सुखरूप आहे. तर डाव्या बाजूला पुढे अंगरक्षक पोलीस तर मागे विनायक मेटे बसले होते. अपघातग्रस्त गाडीला डाव्या बाजूला जास्त क्षती पोहोचली आहे. अपघाताची माहिती समजतात, देवदूत रेस्क्यू यंत्रणा, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्था आणि महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. दुर्दैवाने उपचारादरम्यान विनायक मेटे यांचं अकाली निधन झालं. तर त्यांच्या अंगरक्षक याच्यावर पनवेलच्या MGM रुग्णालयात अति दक्षता विभागात उपचार सुरू आहेत. डोक्याला मार लागल्यामुळ मेंटेंचा मृत्यू 'विनायकराव मेटे यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आणि धक्कादायक आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आज सकाळी 6 ते 6.30 वाजेच्या सुमारास मला माहिती मिळाली. त्यांच्या गाडीला अपघात कसा याची माहिती घेत होतो. त्यानंतर रुग्णालयात आलो तेव्हा साधारणपणे डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचं निधन झालं अशी प्राथमिक माहिती डॉक्टरांनी दिली अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
First published:

पुढील बातम्या