ठाणे, 7 ऑक्टोबर : महाराष्ट्रभरात तुफान पाऊस सुरू आहे. ठाण्यातील मार्केट आणि वंदना डेपो परिसरातही काही तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवलीसह मुंबईतही तुफान पाऊस सुरू आहे. गेल्या दोन ते तीन तासांपासून या परिसरात पावसाचं धुमशान आहे. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची धांदल उडाली. त्याशिवाय ठिकठिकाणी पाणी साचल्याचं चित्र आहे.
येत्या ४,५ दिवसात राज्यात गडगडाटासह पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. कृपया तपशीलांसाठी IMD वेबसाइट पहा.
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 7, 2022
Mumbai Thane very cool strong breeze with light to mod showers since morning. Thane and up thunder reported too.
A typical rainy day... pic.twitter.com/J4Zr6VVkkn
राज्यात परतीचा पाऊस होत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता परंतू हा परतीचा पाऊस पुढचे काही दिवस थैमान घालण्याची शक्यता आहे. दरम्यान मागच्या दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसाने जोरदार हजेरी लावत शेतीचे मोठे नुकसान केले आहे.
ठाण्यातील मार्केट आणि वंदना डेपो परिसरातही काही तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. #RainAlert #Thane_Rain pic.twitter.com/ML0eH1CBnI
— News18Lokmat (@News18lokmat) October 7, 2022
याचबरोबर हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज (दि. 07) मुंबई शहर, उपनगर आणि आजूबाजूच्या भागात पावसाच्या हलक्या सरी किंवा विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे. तर उद्या (दि. 08) ऑक्टोबर शनिवारी विजांच्या कडकडाटांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. Weather Update Maharashtra Rain : राज्यात सर्वदूर पाऊस, मुंबईत पाऊस तळ ठोकणार, हवामान खात्याकडून अलर्ट तर पुढचे दोन दिवस मुंबईसह राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण राहणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची चिन्हे आहेत. त्यानंतर 11 आणि 12 ऑक्टोबर रोजी ढगाळ वातावरण आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.