जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Video : मातोश्रीवर माझा आवाज दाबला गेला, शिंदेच्या भेटीनंतर दिपाली सय्यदांंचा धक्कादायक गौप्यस्फोट

Video : मातोश्रीवर माझा आवाज दाबला गेला, शिंदेच्या भेटीनंतर दिपाली सय्यदांंचा धक्कादायक गौप्यस्फोट

Video : मातोश्रीवर माझा आवाज दाबला गेला, शिंदेच्या भेटीनंतर दिपाली सय्यदांंचा धक्कादायक गौप्यस्फोट

काही दिवसांपूर्वी शिंदे आणि ठाकरे यांनी एकत्र यावं यासाठी प्रयत्न करणाऱ्या दिपाली सय्यदांनी धक्कादायक खुलासा केला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 22 ऑक्टोबर : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या नेत्या दिपाली सय्यद यांनी काही वेळापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर त्या पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दिपाली सय्यद या एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सुषमा अंधारे यांच्या एन्ट्रीनंतर दिपाली सय्यद यांना डावललं जात असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यात त्यांनी शिंदे गटात जाणार असल्याचे संकेत दिले आहेत. माझा आवाज दाबला गेला… यावेळी दिपाली सय्यद म्हणाल्या की, मी अनेकदा उद्धव ठाकरेंना भेटायला प्रयत्न केला. मात्र माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचू दिला नाही. मातोश्रीतील त्यांच्या जवळच्या काही लोकांनी माझा आवाज दाबल्याची खदखद त्यांनी यावेळी व्यक्त केली.

उद्धवसाहेबांना खूप उशीर झाला आहे… यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्याविषयी विचारण्यात आला. यावर त्या म्हणाल्या की, यापूर्वीच मी उद्धव साहेबांना महाराष्ट्रात दौरा करावा, अशी विनंती केली होती. दौरा करायला आता उशिर झाल्याचंही त्या यावेळी म्हणाल्या. उद्धव ठाकरे नॉटरिचेवल.. काही वेळीपूर्वी मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांना भेटणं खूप सोपं होतं. यावेळी आम्ही चर्चाही केली. मात्र उद्धव ठाकरे अद्यापही नॉटरिचेबल असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तुम्ही रात्री, अपरात्रीही भेटायला आला तरी आम्ही भेटणार, नाव न घेता मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत एन्ट्री केल्यानंतर नाराजीनाट्य पुन्हा एकदा समोर आलं. अंधारेंमुळे मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर नाराज असल्याचे चर्चाना उधाण आले होते. त्यातच आता ठाकरे गटाच्या नेत्या दिपाली सय्यद देखील गेले काही दिवस शांत होत्या. आता त्यांनी शिंदेंची भेट घेतल्यानंतर त्या पक्ष बदलणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात