मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शिंदे गटाला भिडणाऱ्या शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंनी बसवलं शेजारी, म्हणाले हेच शिवसेनेचं 'ब्रह्मास्त्र'

शिंदे गटाला भिडणाऱ्या शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंनी बसवलं शेजारी, म्हणाले हेच शिवसेनेचं 'ब्रह्मास्त्र'

 महेश सावंत यांना उद्धव ठाकरे यांच्या बाजूला बसायला देत आदित्य ठाकरे शिवसैनिकांमध्ये बसले.

महेश सावंत यांना उद्धव ठाकरे यांच्या बाजूला बसायला देत आदित्य ठाकरे शिवसैनिकांमध्ये बसले.

महेश सावंत यांना उद्धव ठाकरे यांच्या बाजूला बसायला देत आदित्य ठाकरे शिवसैनिकांमध्ये बसले.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  sachin Salve

मुंबई, 11 सप्टेंबर : शिवसेनेचा (shivsena) बालेकिल्ला असलेल्या दादरमध्ये बंडखोर आमदार सदा सरवणकर (mla sada sarvankar) आणि शिवसैनिकांनी मध्ये जोरदार राडा झाला. सदा सरवणकर यांनी बंदुकीचा धाक दाखवण्याचा प्रयत्न केला. पण, शिवसैनिकांनी जशास तसे उत्तर दिले. शिंदे गटाला भिडणाऱ्या शिवसैनिकांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठ थोपाटली आहे.

दादरमध्ये शनिवारी मध्यरात्री शिवसैनिक आणि शिंदे गट आमनेसामने आले होते. आमदार सदा सरवणकर यांनी बंदुकीचा धाक दाखवून दमबाजी केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. यावेळी दोन्ही गटामध्ये हाणामारी झाली होती. त्यानंतर आज शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली तसंच सदा सरवणकर यांच्या कार्यालयावर देखील दगदफेक सुद्धा केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दादरमधील शिवसैनिकांना मातोश्रीवर बोलावले होते.

(दादरमध्ये शिवसैनिक भडकले, सदा सरवणकरांच्या कार्यालयावर दगडफेक, पोस्टरही फाडले)

यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांचं कौतुक केलं. महेश सावंत आणि इतर 5 शिवसैनिकांचं शिवसेना उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कौतुक केलं. उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांवर कौतुकाची थाप दिली. विशेष म्हणजे, महेश सावंत यांना उद्धव ठाकरे यांच्या बाजूला बसायला देत आदित्य ठाकरे शिवसैनिकांमध्ये बसले.

काय घडलं दादरमध्ये?

प्रभादेवीमध्ये शुक्रवारी शिंदे विरुद्ध शिवसेना गटात जोरदार राडा झाला. बंडखोर आमदार सदा सरवणकर विसर्जन मिरवणुकीवेळी मनसेच्या स्वागत कमानीमध्ये दिसून आले होते. यावरून वातावरण तंग होते परंतु कोणताही वाद झाला नव्हता. हा वाद शनिवारी आणखी टोकाला गेला. शिंदे गटातील शाखाप्रमुख संतोष तेलवणे यांना शिवसेना कार्यकर्त्यांनी चोप दिला. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. अखेर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्जही केल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला.

सदा सरवणकर यांच्यासह 10 जणावर गुन्हा दाखल

मध्यरात्री झालेल्या राड्यानंतर शिवसैनिकांवर गुन्हा दाखल झाला खरा मात्र आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी दादर पोलीस ठाण्यात धाव घेतल्यानंतर घडामोडींना वेग आला आहे. शिवसैनिकांवर दाखल गुन्ह्यातील घातक कलम 395 वगळलं गेलंय तर आमदार सदा सरवणकर,समाधान सरवणकर यांच्याविरोधात अखेर गुन्ह्याची नोंद झाली. सदा सरवणकर आणि त्यांचा मुलगा समाधान सरवणकर, संतोष तेलवणे यांच्यासह 10 जणांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर  पाचही शिवसैनिकांना जामिनावर सोडले जाणार आहे.

First published:

Tags: दादर