मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सडलेली पानं झडताहेत, ती केराच्या टोपलीत जातील; बंडखोरांवर उद्धव ठाकरे यांचा निशाणा

सडलेली पानं झडताहेत, ती केराच्या टोपलीत जातील; बंडखोरांवर उद्धव ठाकरे यांचा निशाणा

आजही आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही. बाळासाहेबांनी सामान्यांना असामान्यत्व दिल हीच शिवसेनेची ताकद आहे. आता पुन्हा एकदा या सामान्यातून असामान्य लोप घडवण्याची वेळ आली आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं,

    मुंबई, 26 जुलै : शिवसेना पक्ष बंडखोरीमुळे दुभागला गेला आहे. सध्या शिवसेना कुणाची हा लढा कायद्याच्या चौकटीत अडकला आहे. शिवसेनेतील अंतर्गत कलह अजूनही सुरुच आहे. आरोप प्रत्यारोप सुरुच आहे. मात्र या सर्व राजकीय उलथापालथी दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गेल्या काही दिवसांपासून शांत होते. मात्र शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली, त्यात अनेक गोष्टीचा उलगडा केला आहे. बंडखोर आमदारांच्या बाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी सडलेले पानं झडून पडली असल्याचं म्हटलं आहे. शिवसेनेतून बाहेर पडून वेगळे झालेल्या आमदारांना उद्देशून बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, सडलेली पानं झडताहेत. ज्यांना झाडाकडून सगळं काही मिळालं, सगळा रस मिळाला म्हणून त्यांचा टवटवीतपणा होता. ती पानं सगळं झाडाकडून घेऊनही गळून पडत आहेत. झाड आता उघडंबोडपं झालंय असं दाखवायचा ते प्रयत्न करत आहेत. पण दुसऱ्या दिवशी माळीबुवा येतो, ती पानगळ केराच्या टोपलीत घेतो आणि घेऊन जातो. 'हे वेदनादायी सत्य आयुष्यभर सोबत राहील'; बंडखोरी होण्याआधी नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट झडलेली, सडलेली पानं केराच्या टोपलीत टाकण्याची प्रक्रिया आता सुरू आहे. अजूनही मोठ्या संख्येने ज्येष्ठ शिवसैनिक येऊन भेटत आहेत. त्यांना शिवसेनेकडून काही मिळाव ही अपेक्षा नव्हती आणि आजही नाही. पण ते येऊन आशीर्वाद देत आहेत. हेच आशीर्वाद शिवसेनेला बळ देतील. आता नवीन कोंब फुटायला लागले आहेत. शिवसेनेचं तरुण आणि युवांशी नातं शिवसेनेच्या जन्मापासूनच आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. शरद पवारांनी नाही फसवलं पण माझ्याच..., उद्धव ठाकरे मुलाखतीत थेट बोलले, VIDEO माझे वडील का चोरताय? उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, ज्यांच्यावर आम्ही विश्वास टाकला त्यांनीच विश्वासघात केला. तेच आता आम्ही हिंदुत्व सोडलंय म्हणून आवई उठवत आहेत. त्यांना मला हाच प्रश्न विचारायचा आहे की, 2014 साली भाजपने युती तोडली होती, तेव्हा आपण काय सोडलं होतं? काहीच सोडलं नव्हतं. आजही आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही. बाळासाहेबांनी सामान्यांना असामान्यत्व दिल हीच शिवसेनेची ताकद आहे. आता पुन्हा एकदा या सामान्यातून असामान्य लोप घडवण्याची वेळ आली आहे. ज्यांचे आईवडील सुदैवाने त्यांच्यासोबत आहेत त्यांनी त्यांच्या आईवडिलांच्या आशीर्वादाने काम करावे. माझे वडील का चोरताय? म्हणजेच काय तुमच्यामध्ये कर्तृत्व नाहीये, तुमच्यात हिंमत नाहीये. तुम्ही मर्द नाहीत. तुम्ही विश्वासघातकी आहात आणि माझा तर विश्वासघात केला, असं ते म्हणाले.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Shivsena, Uddhav thackarey

    पुढील बातम्या