मुंबई, 29 नोव्हेंबर : शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळख असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली झाली आहे. मात्र, अद्याप त्यांना नवीन पोस्टिंग देण्यात आलेली नाही. कुटुंब कल्याण विभागाच्या संचालकपदावरून मुंढेंची बदली करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांची आता शिर्डी देवस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे अधिकार आज राज्य सरकारने दिले आहेत.
16 वर्षात 20 पेक्षा जास्त वेळा बदल्या
तुकाराम मुंढे यांची ही काही पहिलीच बदली नाही. आतापर्यंत 16 वर्षात तुकाराम मुंढे यांच्या 20 पेक्षा जास्त वेळा बदल्या झाल्या आहेत. दोन महिन्यापूर्वीच तुकाराम मुंढे यांची बदली झाली होती. स्पटेंबर 2022 मध्ये तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात होती. या दोन महिन्यात आरोग्य विभागात शिस्त आणण्याचा मुंढे यांचा प्रयत्न होता. मुंढे यांच्याकडे राष्ट्रीय आरोग्य अभियानाची जबाबदारी होती.
वाचा - मुंबई महापालिका निवडणुकीआधी राज ठाकरेंची मोठी घोषणा; शिंदे-भाजपला खो नाहीच
मंगळवारी सरकारनं राज्यातील 6 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यात आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची देखील बदली करण्यात आली. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस तुकाराम मुंढेंकडे आरोग्य आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहोती. आरोग्य भवन येथील कार्यालयात डॉ. रामास्वामी एन. यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला होता. त्यांच्याकडे राष्ट्रीय आरोग्य अभियानाची जबाबदारी होती. काही दिवसांपूर्वीच आरोग्य आयुक्त तुकाराम मुंडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरोग्य केंद्रांना रात्री-बेरात्री भेटी देण्याचे आदेश काढले. रुग्णांना 24 तास वैद्यकीय सेवा मिळून त्यांची प्रकृती सुधारावी असा हेतू आदेशांमागे होता.
तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाची जबाबदारी घेतल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या शिस्तीबाबत एक परिपत्रक काढले होते. यामध्ये आरोग्य खात्यातील विभाग प्रमुख, प्रादेशिक विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख, इतर अधिकारी व कर्मचारी यांना कार्यालयीन शिस्तीचे पालन करण्याबाबत वेळोवळी सूचना देण्यात आल्या होत्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Tukaram mundhe