जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Mumbai : 'या' पानवाल्याकडं आहे 250 देशांमधील घंटांचा संग्रह, पाहा Video

Mumbai : 'या' पानवाल्याकडं आहे 250 देशांमधील घंटांचा संग्रह, पाहा Video

Mumbai : 'या' पानवाल्याकडं आहे 250 देशांमधील घंटांचा संग्रह, पाहा Video

बोरिवलीतल्या घंटावाला पानमंदिरात तब्ब्ल 250 देशामधल्या 364 पेक्षा जास्त घंटाचा संग्रह आहे. पान तयार झाल्यावर घंटा वाजवून ग्राहकाला पान देण्यात येते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 14 नोव्हेंबर : जेवण झाल्यावर तोंडात चघळण्यासाठी किंवा दिवसातल्या कोणत्याही प्रहरी तलफ आली म्हणून खाण्यासाठी अनेकांना पान आवडते. आपल्या देशातील कोणत्याही भागातील चौकात पानाचे दुकान किंवा एखादी छोटी टपरी नक्की असते. या पानटपरीवर वेगवेगळ्या प्रकारचे पान मिळतात. यामधील कलकत्ता आणि बनारसी पान हे तर विशेष प्रसिद्ध आहे. मुंबई शहरातील अनेक दुकानदार ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणखी काही प्रकार ठेवत असतात. अगदी 2 रुपयांपासून मिळणाऱ्या साध्या पानापासून ते एखाद्या विशिष्ट दिवसासाठी मिळणाऱ्या स्पेशल पानापर्यंतचे प्रकार पानवाल्यांकडे मिळतात. त्यामुळेच त्यांच्याकडे ग्राहकांची गर्दी असते. या पानमंदिरात काय आहे खास? मुंबईतील बोरिवलीच्या एका खास पानमंदिराची आम्ही तुम्हाला ओळख करुन देणार आहोत. बोरिवलीत असलेल्या घंटावाला पानमंदिरात तब्ब्ल 250 देशामधल्या 364 पेक्षा जास्त घंटाचा संग्रह आहे. पान तयार झाल्यावर घंटा वाजवून ग्राहकाला पान देण्यात येते. विशेष म्हणजे या घंटा या नेहमी विदेशात जाणाऱ्या ग्राहकांनी आणून दिल्या आहेत. येथील नेहमीचे ग्राहक विदेशात गेल्यानंतर आपल्या लाडक्या घंटावाला पानमंदिरासाठी घंटा आणतात. यापूर्वी दुकानात कानात घंटा टांगलेल्या होत्या मात्र दुकान रस्त्यालगत असल्यामुळे त्यावर धुळ जमून ती खराब होत असे, त्यामुळे आता त्यांना खास शोकेसमध्ये ठेवण्यात आले आहे. मुंबईचा प्रसिद्ध वेफर्स पाव, वडापावलाही देतोय टक्कर! पाहा Video कोणत्या देशातील घंटांचा संग्रह? दुबई, सिंगापूर, मलेशिया, थायलंड, ,फ्रान्स, जपान अशा अनेक देशातून ग्राहक मित्रांनी आणलेल्या घंटा इथं  आहेत. अशोक कुमार नावाच्या एका ग्राहकाने फ्रान्समधून त्यांना पहिली काचेची घंटा आणून दिली. ही घंटा ग्राहकांना चांगलीच आवडली. त्यानंतर अनेकांनी आपल्याला घंटा गिफ्ट दिल्या, असं याचे मालक विनोद तिवारी यांनी सांगितले. तिवारी यांचा स्वत:चा देखील घंटा जमवण्याचा संग्रह आहे. त्यांच्या नावावर 3 वर्ल्ड रेकॉर्ड असून घंटांचा संग्रह करणारे जगातले पहिले पानवाले अशी त्यांची ओळख आहे. या घंटा जमवायला त्यांना 20 वर्ष लागलेत. हैदराबादी मिरचीचे स्पेशल आंध्र भजी, एकदा खाल तर पुन्हा मागाल, Video कोणत्या धातू पासून बनवलेल्या घंटा येथे आहेत? पितळ, काच, चिनिमाती, अश्या विविध पदार्थांपासून बनवलेल्या घंटा येथे पाहायला मिळतात. कशी सुचली कल्पना? तिवारी परिवार हा शिवभक्त आहे. काशीमधील एकाने विनोद यांच्या आजोबांना पान विकताना शंकराला अर्पण करून विकावे असे सांगितले तेव्हापासूनच हे पान ग्राहकांच्या हातात देण्याआधी घंटा वाजवली जाते.

    गुगल मॅपवरून साभार

    घंटावाला पान मंदिर कोठे आहे? बोरिवली पश्चिम येथे रेल्वे स्टेशनपासून 5 मिनिटांच्या अंतरावर हे दुकान आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: Local18 , mumbai
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात