मुंबई , 13 ऑक्टोंबर : द ट्रान्स कॅफे या आगळ्यावेगळ्या आणि वैशिष्ट्यपूर्ण कॅफेची सुरुवात मुंबईच्या अंधेरी चार बंगला परिसरात झाली आहे. या आगळ्या वेगळ्या कॅफेची मालकी आणि व्यवस्थापन संपूर्णपणे ट्रान्सजेंडर व्यक्तीकडे आहे. तृतीयपंथीय समाजाकडे एक दुर्लक्षित, वंचित घटक म्हणून पाहिलं जातं. मात्र, ही लोकं तुमच्या आमच्या सारखी व्यक्ती असतात आणि त्यांना सुद्धा उपजीविकेचं साधन उपलब्ध व्हावं. तसंच स्वाभिमानाने जगता यावं यासाठीचं मुंबईतील रोटरी क्लब ऑफ क्वीन्स नेकलेस आणि रोटरी क्लब इन्स्पायर यांच्या सहकार्याने हे कॅफे सुरू करण्यात आले आहे. कॅफेची सुसज्ज व्यवस्था कशी आहे? 20 आसनी सुसज्ज अशा या कॅफेमध्ये विविध प्रकारच्या कॉफी, सॉफ्ट ड्रिंक्स, हेल्दी ड्रिंक्स, बेकरी फूड तसंच अन्य चवदार पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. आधुनिक वॉल पेंटिंग्सने या कॅफेची शोभा वाढवली आहे. ट्रान्सजेंडर समुदाय आणि सर्वसामान्यांना एकत्र येण्यासाठी हे हक्काचं ठिकाण असणार आहे. द ट्रान्स कॅफेचं नेतृत्व आणि मालकी ट्रान्सजेंडर महिला उद्योजिका झैनाब पटेल यांच्याकडे आहे.
हेही वाचा : Pune: न बोलताच मिळेल ऑर्डर! पुण्यातील ‘या’ हॉटेलमध्ये चालते सांकेतिक भाषा, VIDEO
द ट्रान्स कॅफे भविष्यातचे संपूर्ण भारतात आउटलेट उघडण्यात येईल तृतीयपंथीय समाजाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे आणि तो येथे आल्यावर नक्कीच बदलेल अश्या पद्धतीची सेवा ठिकाणी मिळेल. कॉर्पोरेट कंपन्यामध्ये आजही अनेक तृतीय पंथीयांना कामावर ठेवण्यापासून नाकारलं जातं. मात्र, त्यांच्यात काम करण्याची तयारी असते. ते हुशार असतात. त्यांच्यात कलागुण असतात आणि त्याच गोष्टींना आम्ही ही संधी उपलब्ध करून दिली आहे. द ट्रान्स कॅफे भविष्यातचे संपूर्ण भारतात आउटलेट उघडण्यात येईल, असं रोटरी क्लबच्या सदस्या शांता गांधी यांनी सांगितले. हेही वाचा :
Mumbai : ‘इशाऱ्या’वर चालणारं हॉटेल, दिव्यांग वेटर्सना ऑर्डर देण्याची आहे खास पद्धत, Video
कुठे आहे द ट्रान्स कॅफे पत्ता: बंगला क्रमांक 31/31, लक्ष्मी डेअरीसमोर, जुने म्हाडा एसव्हीपी नगर, हनुमान मंदिराजवळ, अंधेरी (पश्चिम) मुंबई- 40053

)







