मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Mumbai : 'इशाऱ्या'वर चालणारं हॉटेल, दिव्यांग वेटर्सना ऑर्डर देण्याची आहे खास पद्धत, Video

Mumbai : 'इशाऱ्या'वर चालणारं हॉटेल, दिव्यांग वेटर्सना ऑर्डर देण्याची आहे खास पद्धत, Video

Ishaara Hotel : मुंबईतील इशारा हॉटेलमधील सर्व कर्मचारी हे मूकबधीर असून त्यांना ऑर्डर देण्याची खास पद्धत आहे.

मुंबई, 22 सप्टेंबर : मुंबईतल्या प्रत्येक भागात अनेक हॉटेल्स आहेत. साध्या टपरीपासून ते फाईव्ह स्टार हॉटेलपर्यंत प्रत्येक हॉटेलची खासियत असते. काही हॉटेल्स तिथं मिळणाऱ्या मेन्यूमुळे तर काही तेथील फर्निचर, सजावट तसंच इतर गोष्टींमुळे लक्षात राहातात. मुंबईतील लोअर परळ भागात इशारा हे हॉटेल नेहमीच्या या वैशिष्ट्यांपेक्षा हटके आहे. या हॉटेलचं वेगळेपण तुम्हाला तिथं प्रवेश केल्यानंतरच जाणवतं. काय आहे वेगळेपण? लोअर परेलच्या फिनिक्स मॉलमध्ये 2019 साली इशारा  हॉटेल सुरू झालं आहे. या हॉटेलचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे  इथं ग्राहकांच्या स्वागतापासून ते जेवण वाढण्यापर्यंत सर्व गोष्टी या मूकबधीर तरूण-तरूणी करतात. 'या तरूणांना स्वाभिमानानं  आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम जगता यावं हा प्रयत्न हॉटेलच्या माध्यमातून केला जातो, अशी माहिती इशाराचे मालक प्रशांत इसार यांनी दिली आहे. ऑर्डर देण्याची खास पद्धत प्रचलित मार्गापेक्षा वेगळी कल्पना असलेल्या या हॉटेलमध्ये गेल्यावर ऑर्डर कशी द्यायची? कर्मचाऱ्यांशी संवाद कसा करायचा? हा प्रश्न तुम्हाला पडणे स्वाभाविक आहे. तुमच्या या प्रश्नाचे उत्तर देखील आम्ही देणार आहोत. या हॉटेलमध्ये प्रवेश केल्यानंतर ग्राहकांना इशारा चॅटच्या माध्यमातून वेटर्सशी कसा संवाद साधायचा याचे प्रशिक्षण दिले जाते. .मेनू कार्ड वर विशिष्ट खुणा दर्शवून कुठला पदार्थ कसा ऑर्डर करायचा हे स्पष्ट करण्यात आले आहे आणि तेथील कर्मचाऱ्यांच्या पोशाखावर सुद्धा त्यांची नावं साईन लँग्वेजमध्ये देण्यात आली आहेत. Nashik : जेवणासोबत घ्या पुस्तकांची मेजवानी; 75 वर्षांच्या आजींचे लय भारी हॉटेल, VIDEO 'या मुलांना घर चालवण्यासाठी त्यांच्या हातामध्ये काम असायला हवं आणि त्याचाच हा छोटासा प्रयत्न आम्ही करत आहोत. संपूर्ण भारतात इशाराच्या शाखा सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे.  भविष्यात या प्रोजेक्टमध्ये 5000  मूकबधिर मुलांना आम्ही काम देण्याची आमची योजना आहे.'  अशी माहिती या हॉटेलमधील वरिष्ठ कर्मचाऱ्यानं दिली.

गुगल मॅप वरून साभार

इशारा हॉटेलचा पत्ता तिसरा मजला 462, फिनोक्स प्लॅडियम मॉल, सेनापती बापट रोड, लोअर परळ मुंबई, 400013 फोन नंबर - 086575, 31988
First published:

Tags: Food, Mumbai, Restaurant, मुंबई

पुढील बातम्या