जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Jitendra Awhad : करमुसे मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाडांना धक्का, सुप्रीम कोर्टाने बजावली नोटीस

Jitendra Awhad : करमुसे मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाडांना धक्का, सुप्रीम कोर्टाने बजावली नोटीस

Jitendra Awhad : करमुसे मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाडांना धक्का, सुप्रीम कोर्टाने बजावली नोटीस

अनंत करमुसे यांचे अपहरण करत मारहाण केल्या प्रकरणी जितेंद्र आव्हाडांविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 22 ऑक्टोबर : राष्ट्रवादीचे आक्रमक आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. घोडबंदर येथील कावेसर येथे राहणाऱ्या अनंत करमुसे यांनी 5 एप्रिल 2020 मध्ये जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात सोशल मिडीयावर आक्षेपार्ह विधान केले होते. यानंतर आव्हाड यांच्या सुरक्षारक्षकासह काही कार्यकर्त्यांनी करमुसे यांना आव्हाड यांच्या निवासस्थानी नेत मारहाण केल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणी अनंत करमुसे यांचे अपहरण करत मारहाण केल्या प्रकरणी आव्हाडांविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.

जाहिरात

याबाबत सुप्रीम कोर्टाने करमुसे यांची याचिका स्विकारत जितेंद्र आव्हाड यांना नोटीस बजावली आहे. याचबरोबर ठाण्याचे पोलीस आव्हाडांना सहकार्य करत असल्याचेही आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी यासाठी अशी मागणी याचिकाकर्त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केली आहे.

जाहिरात

हे ही वाचा :  ‘मुंबईच्या ठाकरेंची आजही दहशत, NCP च्या नादाला लागाल तर हात…’, देवेंद्र भुयार यांचा थेट इशारा

जितेंद्र आव्हाड याच्याविरोधात अनंत करमुसे यांना मारहाण केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर 25 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. करमुसे मारहाण प्रकरणाची सीबीआयतर्फे चौकशी करावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. या प्रकरणी 14 ऑक्टोबर 2021 रोजी आव्हाड यांना ठाणे पोलिसांनी अटक केली होती. त्यांना ठाणे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली होती.

जाहिरात

हे ही वाचा :  राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत ठाकरे कुटुंबातून कोण येणार? अशोक चव्हाण म्हणाले…

याप्रकरणी करमुसे यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात पोलिसांनी आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांना अटकही केली होती.पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून त्यांना ठाणे न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना 10 हजार रुपयांच्या जातमुचक्यावर जामीन मंजूर करण्यात आला होता.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात