जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मग काय शेजाऱ्याचा बेटा राजा बनेल का? पेडणेकरांचा संदीप देशपांडेंना थेट सवाल

मग काय शेजाऱ्याचा बेटा राजा बनेल का? पेडणेकरांचा संदीप देशपांडेंना थेट सवाल

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट करून शिवसेनेवर निशाणा साधला होता. त्यांच्या ट्वीटला किशोरी पेडणेकरांनी उत्तर दिले

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट करून शिवसेनेवर निशाणा साधला होता. त्यांच्या ट्वीटला किशोरी पेडणेकरांनी उत्तर दिले

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट करून शिवसेनेवर निशाणा साधला होता. त्यांच्या ट्वीटला किशोरी पेडणेकरांनी उत्तर दिले

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 25 जुलै : ज्या प्रकारे युती आघाडी प्रमाणे हे अनैसर्गिक वाक्य आहे राजा का बेटा नाही बनणार तर काय शेजारीचा बेटा बनेल तुम्ही देखिल तुमच्या मुलाला पुढे करता, असं म्हणत शिवसेनेच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना चांगलेच फटकारून काढले. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट करून शिवसेनेवर निशाणा साधला होता. यावेळी संदीप देशपांडे यांनी सूपर 30 या हिंदी सिनेमातील डॉयलॉग म्हणून शिवसेनेला टोला लगावला. त्यांच्या डायलॉगबाजीला शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी आपल्या स्टाईलमध्ये उत्तर दिलं. ‘ज्या प्रकारे युती आघाडी झाली आहे, त्याप्रमाणे हे अनैसर्गिक वाक्य आहे. राजा का बेटा राजा नाही बनणार तर काय शेजारीचा बेटा बनेल का? तुम्ही देखिल तुमच्या मुलाला पुढे करतात. यांचे वासे पहिल्यांदा फिरले, त्यामुळे घर फिरले, असा टोला पेडणेकर यांनी देशपांडेंना लगावला. ‘भितीने हे बंड झाले आहे. शिवसैनिक याला उत्तर  देतील. काळा प्रमाणे याचे उत्तर मिळेल. आता लोहचुंबक होत राहणार आहे. चंद्रकांत पाटील बोलले की, काळजावर दगड ठेवून मुख्यमंत्री बनवलं आता कळेल कुठले दगड घेतले, असा टोलाही पेडणेकर यांनी लगावला. ‘आदित्य ठाकरे हे पर्यावरण मंत्री झाले होते. त्यांनी काम केली, त्यांनी काही घरातून फंड दिला नाही प्रशासन उत्तर देईल. महाराष्ट्रातील लोकांनी जनतेसाठी उद्धव ठाकरे यांनी  जे केले ते जनता विसरणार नाही. आता गोतावळ्याला जमवण्यासाठी मेहनत सुरू आहे. नागरिकांच्या त्रासाची किंमत मोजावी लागेल, असंही पेडणेकर म्हणाल्या. ‘मुंबईमध्ये गणेशोत्सवबाबत मूर्तीची उंची किती असावी  केंद्राने भूमिका मांडली पाहिजे. केंद्राने त्यावेळी नोटीस बजावली होती. मूर्तीची उंची मर्यादित असावी असे सांगितले ते सगळ स्पष्ट करावे, अशी मागणीही पेडणेकर यांनी केली. काय म्हणाले होते संदीप देशपांडे? अब राजा का बेटा राजा नही बनेगा राजा वही बनेगा जो हकदार होगा त्याचा मतितार्थ आहे. बाळासाहेबांचे विचार आता राज ठाकरे पुढे घेऊन जाणार आहेत, बाकी कुणीही नाही, असा दावाच देशपांडेंनी केला.

जाहिरात

हिंदुत्व, मराठी माणसाचा, विकासाचा विचार असेल तो राज ठाकरेच पुढे नेत आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर कुणाचाही मालकी हक्क नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तुम्ही आचरणात आणले का? असा सवालच देशपांडेंनी केली. बाळासाहेबांनी ज्यांना विरोध केला त्यांच्यासोबतच तुम्ही व्यवहार केला. उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांकडून प्रतिज्ञापत्र मागतात यापेक्षा मोठं दुर्दैव नाही. शिवसेनेवर आलेल्या या वेळेचं क्रेडिट उद्धव ठाकरेंना जातं, अशी टीका संदीप देशपांडेंनी केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात