मुंबई, 04 ऑक्टोंबर : शिवसेना ठाकरे गटाची काल (दि. 03) शिवसेना भवनात दसरा मेळावा पूर्व तयारीसाठी महत्वाची बैठक झाली. या बैठकीला शिवसेना नेते विनायक राऊत, अनिल देसाई आणि मुंबईतील सर्व विभाग प्रमुख तसेच युवासेना सचिव वरुण सरदेसाई आणि शिवसेना सचिव सूरज चव्हाण उपस्थित होते. दरम्यान या बैठकीत रामदास कदम यांच्या चिरंजीवाचे युवासेनेच्या कोअर कमिटीत अद्याप नाव असल्याने वरूण सरदेसाई यांना जाब विचारण्यात आला, यामुळे काही काळ वातावरण तापले होते.
याच बैठकीत सिद्धेश रामदास कदम अजूनही युवासेनेच्या कोअर कमिटी कार्यकारणीत कसा आहे..? असा प्रश्नं विभाग प्रमुख सुधाकर सुर्वे आणि विलास पोतनीस यांनी उपस्थित केला. त्यावर शिवसेना नेते अनिल देसाई आणि विनायक राऊत यांनीही आश्चर्य व्यक्तं करत युवासेना सचिव वरुण सरदेसाई आणि सूरज चव्हाण यांना जाब विचारला..? यावर वरुण सरदेसाई आणि सूरज चव्हाण यांनी यावर लवकरच निर्णय शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारून घेऊ असे उत्तर दिले. हे उत्तर एकूण उपस्थित विभाग प्रमुख चांगलेच भडकले.
हे ही वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सही केली अन् तब्बल 1 कोटी खिशात; तरुणांनी वापरली नवी क्लुप्ती
सध्या रामदास कदम आणि त्यांचे चिरंजीव आमदार योगेश कदम शिवसेना शिंदे गटात असून ते दररोज शिवसेना ठाकरे गटावर जहरी टीका करत आहेत. अशा प्रसंगी रामदास कदम यांचे दुसरे चिरंजीव सिद्धेश कदम शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेनेत अजून कसे काय कार्यरत आहेत… त्यांची हाकालपट्टी अजून का केली नाही..? असे प्रश्नं विभाग प्रमुखांनी विचारून युवासेनेच्या कार्यपद्धतीवर राग व्यक्तं केला असल्याची माहीती वरिष्ठ सूत्रांनी दिलीय.
दसरा मेळाव्यावर फडणवीस म्हणतात…
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी रात्री काळा चौकी येथील मराठी दांडियाला हजेरी लावली होती. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर प्रतिक्रिया दिली. यंदा शिवसेनेतील शिंदे गट आणि ठाकरे गट असा दोघांचाही वेगवेगळा दसरा मेळावा होणार आहे. यावर बोलताना फडणवीस म्हणाले, की मी दोन्ही दसरा मेळावा भाषणं पाहणार नाही. यामागचं कारणही त्यांनी सांगितलं आहे.
हे ही वाचा : शिंदेंकडून 2014 लाच ‘महाविकासआघाडी’ची ऑफर, अशोक चव्हाणांचा दावा, पण पवारांनीच काढली हवा?
मी दोन्ही दसरा मेळावा भाषणं पाहणार नाही. त्यावेळी मी नागपुरात धम्म चक्र परिवर्तन कार्यक्रमात सहभागी होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. पुढे बोलताना ते म्हणाले, की दोन्ही दसरा मेळावा अत्यंत व्यवस्थित पार पडतील. कायदा आणि सुव्यवस्थेचं कठोर पालन केलं जाईल. मात्र, सध्या जी परिस्थिती आहे, त्याकडे कोणीही दुर्लक्ष करून चालणार नाही. देशविघातक कृत्य करणाऱ्या कोणीही या गर्दीचा गैरफायदा घेऊ नये. अन्यथा कडक कारवाई करणार असल्याचं ते म्हणाले.