जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'या रे या..', शिंदे गटाने भरले 10 कोटी रुपये रोख, 1700 लालपरी बूक, 2 दिवस लागले पैसे मोजायला!

'या रे या..', शिंदे गटाने भरले 10 कोटी रुपये रोख, 1700 लालपरी बूक, 2 दिवस लागले पैसे मोजायला!

 ही रक्कम मोजण्यासाठी रविवार आणि सोमवार असे दोन दिवस लागले होते, अशी माहिती समोर आलं आहे.

ही रक्कम मोजण्यासाठी रविवार आणि सोमवार असे दोन दिवस लागले होते, अशी माहिती समोर आलं आहे.

ही रक्कम मोजण्यासाठी रविवार आणि सोमवार असे दोन दिवस लागले होते, अशी माहिती समोर आलं आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 04 ऑक्टोबर : दसरा मेळाव्यासाठी शिवसेना आणि शिंदे गटामध्ये गर्दी जमवण्यासाठी चांगलीच शर्यत रंगली आहे. राज्यभरातून समर्थकांना मुंबईत आणले जात आहे. शिंदे गटाने समर्थकांना आणण्यासाठी तब्बल 1700 एसटी बसेसचं बुकिंग केल्याचं समोर आलं आहे. यासाठी तब्बल 10 कोटी रुपये रोख भरले असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेला टक्कर देत शिंदे गट मुंबईतील बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेत आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. शिंदे गटाकडून राज्यभरातून समर्थकांना मुंबईत आणले जात आहे. दसरा मेळाव्यामुळे एसटी महामंडळाला सोन्याचे दिवस आले आहे. शिंदे गटाकडून  तब्बल 1700 हून अधिक लालपरी बसेसचं बुकिंग करण्यात आले आहे. यासाठी शिंदे गटाने तब्बल १० कोटी रुपये रोख भरले आहे. ही रक्कम मोजण्यासाठी रविवार आणि सोमवार असे दोन दिवस लागले होते, अशी माहिती  विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.  दसऱ्याला प्रथमच इतकी मोठी बुकिंग एसटी महामंडळात झाली आहे. (गिरीश महाजन म्हणतात ‘आम्ही खूप प्रयत्न केले, पण शेवटी रामदास आठवलेंमुळेच भाजप सत्तेत आलं’) दरम्यान,  मुंबईच्या बीकेसी मैदानावर बुधवारी शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. या मेळाव्याकरिता वर्धा जिल्ह्यातूनही बसने कार्यकर्ते रवाना झाले आहे. जिल्ह्याच्या आठ तालुका मिळून एकूण 12 बस मुंबईला रवाना करण्यात आल्या आहे. वर्धेच्या शिंदे गटाच्या कार्यालयासमोरून सकाळी बसला झेंडा दाखवून रवाना करण्यात आले आहे. मुंबई येथे शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून मेळावे आयोजित करण्यात आले आहे. या मेळाव्याना दोन्ही गट आपले शक्ती प्रदर्शन करत आहे. शिंदे गटाकडून जिल्ह्यातून बसने कार्यकर्ते मुंबईला पाठविण्यात आले आहे मात्र उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून जिल्ह्यात कोणत्याही हालचाली दिसत नाहीय. नाशिकमधून तब्बल 337  बसेस आणि 424 चारचाकी वाहनांचं नियोजन तर, दसरा मेळाव्यासाठी नाशिकमधून ठाकरे आणि शिंदे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. शिंदे गटाने नाशिकमधून बीकेसीच्या मैदानावरती ५० हजाराहून अधिक शिवसैनिक जाणार असल्याचा दावा केला आहे. तर ठाकरे गटाने देखील २० ते २५ हजार शिवसैनिक शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याला उपस्थिती लावतील असा विश्वास व्यक्त केला आहे. ( धनुष्यबाण कुणाला? निवडणूक आयोगाने शिवसेनेला दिली डेडलाईन ) नाशिक मधून तब्बल ३३७ बसेस आणि ४२४ चारचाकी वाहनांच नियोजन केलं आहे. या सगळ्या वाहनांमधून तब्बल ४० ते ५० हजार शिवसैनिक BKC मैदानावरील दसरा मेळाव्याला हजेरी लावतील अशी माहिती दिली. तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या शिवसेनेनीही शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांची बैठक बोलावत जिल्हाभरातून तब्बल २० ते २५ हजार शिवसैनिक शिवतीर्थावर नेण्याच नियोजन पूर्ण केलंय. आम्हाला भाड्याने लोक आणण्याची गरज नसून जे येतील ते कट्टर शिवसैनिक असतील असा दावा केला आहे. ठाकरे गटाने केवळ जेष्ठ नागरिक आणि महिलांसाठी १०० बसेसच नियोजन केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात